सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षण आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यातील वाद काही नवीन नाही. अशातच आता पुन्हा एकदा सदावर्ते यांनी आरक्षणाबाबत एक विधान केलं आहे. जोर जबरदस्ती करुन आरक्षण मिळवता येत नाही, असे वक्तव्य सदावर्ते यांनी केले आहे. वसईमध्ये एका विवाहासाठी सदावर्ते यांनी हजेरी लावली होती त्यावेळी ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते
गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) म्हणाले, मराठा आरक्षणाचा वाद उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पावर यांनी हा वाद उभा केला आहे. येणाऱ्या काळात मराठा समाजातील बांधवांना कळेल की आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारणी आपली पोळी भाजत आहे. मराठा समाज आरक्षणात बसत नाही. मराठा समाजातील बांधवांनी मोठं मोठ्या पदावर जावं पण मागासवर्गीय होऊन जाण्याच्या शोधण्याच्या भानगडीत पडू नये. (Gunaratna Sadavarte)
(हेही वाचा – Ind vs Eng : शामी की सिराज ? लखनौमध्ये कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11?)
जोर जबरदस्ती करुन आरक्षण मिळवता येत नाही
काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाडीची तोडफोड करण्यात आली होती. या विषयी बोलताना सदावर्ते म्हणाले की, “अरे गाडी फोडली तर आरक्षण मिळेल का? मला मारून टाकलं तर आरक्षण मिळेल का? तुम्हालाच आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. तुम्ही आरक्षण मागा पण जोर जबरदस्तीने केलेल्या मागणीला भरताचे संविधान मान्यता देत नाही.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community