Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तिघांना अटक

सदावर्ते यांचा मराठा आंदोलकांवर आरोप

241
Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तिघांना अटक

सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही अज्ञात व्यक्तींकडून सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यामागे मराठा आंदोलक असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६ मजली इमारतीत राहतात. अज्ञातांनी या गाडीच्या एका बाजूच्या सर्व काचा पूर्णपणे फोडल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या गाडीवर काळा कपडा टाकून ती झाकण्यात आली. या गाडीसोबत गुणरत्न सदावर्ते यांच्या मालकीची आणखी एक गाडी फोडण्यात आली आहे.

(हेही वाचा – Ubatha : उबाठा सेनेच्या सिनेट मतदार नोंदणी घोटाळ्यांबाबत फौजदारी गुन्हा दाखल करा…..?)

सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी (Gunaratna Sadavarte) तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मंगेश साबवे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडताना संबंधितांनी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, अशा घोषणा दिल्याची माहिती भोईवाडा पोलिसांकडून देण्यात आली. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरंगे पाटील यांच्यावर सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी नुकतीच टीका केली होती.

जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यातील नेमका वाद काय?

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील सभेत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. सदावर्ते मराठा आरक्षणाला विरोध करतात. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. त्यांना देवेंद्र फडणवीसांनी समज द्यावी, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. जरांगे यांच्या टीकेनंतर गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनीही त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. अरेरावीची भाषा, मग्रुरीची भाषा, स्वतःला पाटील म्हणवून घेणे. ही एक श्रेष्ठता आहे. जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेमध्ये स्वतःला अधिकारशहा मानून बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही मागास नसता आणि जेव्हा तुम्ही मागास नसता तेव्हा तुम्ही मागासलेपणाच्या आरक्षणाला पात्र नसता. महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेपणात येत नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे मराठा आरक्षण मिळणारच नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला झालेली गर्दी म्हणजे निव्वळ जत्रा होती, अशी बोचरी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.