Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या तळमजल्यावरील चावीच्या संदर्भात न्यायालयाचा मोठा आदेश

Gyanvapi Case : अधिकाऱ्यांनी 1993 मध्ये तळघराला बॅरिकेड्स लावून कुलूप लावले होते. यापूर्वी या तळमजल्याचा वापर पुजारी सोमनाथ व्यास यांनी पूजेसाठी केला होता, असे यादव यांनी याचिकेत म्हटले आहे.

260
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या तळमजल्यावरील चावीच्या संदर्भात न्यायालयाचा मोठा आदेश
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या तळमजल्यावरील चावीच्या संदर्भात न्यायालयाचा मोठा आदेश

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील (Gyanvapi Case) तळमजल्याच्या चाव्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्याचे आदेश दिले आहेत. हिंदू बाजूचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्वेश यांनी आदेशात म्हटले आहे की, संकुलाच्या दक्षिण टोकाला असलेल्या व्यासजी यांच्या तळघराच्या योग्य देखभालीची गरज आहे.

(हेही वाचा – Suryakumar Yadav : शस्त्रक्रियेनंतर सुर्यकुमारचा भावपूर्ण संदेश)

हिंदू बाजूचे वकील यादव यांनी यापूर्वी सांगितले होते की, अधिकाऱ्यांनी 1993 मध्ये तळघराला बॅरिकेड्स लावून कुलूप लावले होते. यापूर्वी या तळमजल्याचा वापर पुजारी सोमनाथ व्यास (Somnath Vyas) यांनी पूजेसाठी केला होता, असे यादव यांनी याचिकेत म्हटले आहे.

स्वच्छतेसाठी केली याचिका

वाराणसीतील (Varanasi) ज्ञानवापी मशिदीच्या सीलबंद भागात असलेल्या पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यासाठी हिंदू महिला याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मंगळवार, 16 जानेवारी रोजी स्वीकारली. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपिठाने वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेवर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले.

न्यायालयाने दिले स्वच्छतेचे आदेश

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांनी टाकीमध्ये मृत मासे असल्याचे सांगून ती साफ करण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या त्वरित स्वच्छतेचे आदेश दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.