वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद संकुलाच्या भारतीय पुरातत्व (एएसआय) सर्वेक्षणात ‘वजूखाना’चा समावेश करण्याची मागणी करणारी याचिका वाराणसीच्या न्यायालयाने फेटाळली. (Gyanvapi Case) जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्वेश यांनी आदेशात म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संरक्षित क्षेत्राचे सर्वेक्षण केले जाऊ नये.’ ‘संरक्षित क्षेत्राचे सर्वेक्षण करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असू शकते’, असे जिल्हा सरकारी वकील राजेश मिश्रा यांनी सांगितले. (Gyanvapi Case)
(हेही वाचा – Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात चीनची उडी; जगाची चिंता का वाढली ?)
वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी मंदिर प्रकरणातील याचिकाकर्त्यांपैकी एक राखी सिंग यांनी ‘वजूखाना’चे सर्वेक्षण करण्याची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने 19 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती आणि निकाल राखून ठेवला होता. (Gyanvapi Case)
…त्याशिवाय सत्य उघड होऊ शकत नाही !
गुरुवारी या खटल्याच्या सुनावणीदरम्यान हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव म्हणाले की, सध्या वजूखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण केले जात आहे, परंतु वजुखानाचे सर्वेक्षण केल्याशिवाय ज्ञानवापी संकुलाचे सत्य उघड होऊ शकत नाही.
मशिदीच्या बाजूने यावर आक्षेप घेण्यात आला होता. काशी विश्वनाथ मंदिराजवळील ज्ञानवापी मशिदीच्या संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण होत आहे. जेणेकरून 17 व्या शतकातील मशीद पूर्वी अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिराच्या संरचनेवर बांधली गेली होती का, हे शोधता येईल. (Gyanvapi Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community