वाराणसीचे सध्या छावणीमध्ये रूपांतर झाले आहे. ज्ञानवापी प्रकरणामुळे (Gyanvapi Case) गेल्या दोन दिवसांपासून तेथील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. आजही (शुक्रवारी) वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाच्या आसपास सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यूपी पोलीस सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे, न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यासजींच्या तळघरात पूजेची परवानगी दिल्यापासून पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.
(हेही वाचा – Gyanvapi : ज्ञानवापी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी; पूजा-आरतीचे वेळापत्रक तयार)
मुस्लिम पक्षाकडून बंदची घोषणा –
ज्ञानवापी तळघरात (Gyanvapi Case) पूजा करण्याच्या जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाच्या विरोधात अंजुमन इंतेझामिया मशिदीने जुमाच्या दिवशी (शुक्रवार) बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.अंजुमन इंतेजामियाचे सरचिटणीस अब्दुल बातिन नोमानी यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, ज्ञानवापीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा करण्यास परवानगी दिल्याबद्दल मुस्लिमांमध्ये नाराजी आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ, मुस्लिम जुमुआच्या दिवशी त्यांचे व्यवसाय बंद ठेवतील आणि जुमुआच्या प्रार्थनेपासून अस्रच्या प्रार्थनेपर्यंत प्रार्थना करतील.
(हेही वाचा – N. srinivasan ED Raid : चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंटसवर ईडीची धाड)
अशातच पोलिसांनी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन (Gyanvapi Case) केले असून कोणत्याही अफवांवर लक्ष न देण्यास सांगितले आहे. दरम्यान गुरुवारीच (१ फेब्रुवारी) शहरामध्ये पोलीस फोर्सने फ्लॅग मार्चही केलं. 3 कंपन्या पीएसी, आरएएफबरोबरच गाझीपूर, चंदौली आणि जौनपूरच्या पोलीस दलाच्या तुकड्यात यात सहभागी झालेल्या.
#WATCH | Uttar Pradesh: Security personnel deployed around the Gyanvapi complex in Varanasi. pic.twitter.com/bFLKhQwoVb
— ANI (@ANI) February 2, 2024
(हेही वाचा – BMC Budget 2024 – 25 : मुंबई महापालिकेचा यंदा ५९,९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प)
मुस्लिम पक्ष इलाहाबाद हायकोर्टात जाणार –
व्यासजी तळमजल्यामध्ये पूजा (Gyanvapi Case) करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर मुस्लीम पक्षाकडून या निकालाला इलाहाबाद हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणी आज सुनावणी होऊ शकते. हिंदू पक्षाकडूनही या प्रकरणी कॅव्हेट दाखल करण्यात आली असून आमचं म्हणणंही ऐकून घ्यावं असं सांगण्यात आलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community