वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हिंदू पक्षासाठी दिलासादायक निर्णय दिला आहे. ज्ञानवापी संकुलात सापडलेल्या शिवलिंगाचे संरक्षण पुढच्या आदेशापर्यंत वाढवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढताना ते जिल्हा न्यायाधीशांसमोर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवलिंगाच्या संरक्षणाला न्यायालयाची मुदतवाढ
सर्वोच्च न्यायालयाने सर्वेक्षण आयु्क्ताच्या नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणा-या ज्ञानवापी मशिद समितीच्या याचेकेवर हिंदू पक्षाला तीन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणात हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांच्या निवेदनाची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने गुरुवारी दखल घेतली होती. ज्ञानवापी परिसरात सापडलेल्या शिवलिंगाच्या सुरक्षेची मुदत ही 12 नोव्हेंबर रोजी संपत असून त्याला मुदतवाढ देणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘असल्या पत्रकारांना बोलवत जाऊ नका’, राठोडांबाबत विचारताच चित्रा वाघ पत्रकारांवर कडाडल्या)
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देत वाराणसीच्या जिल्हा दंडाधिका-यांना झानवापी-श्रुंगार गौरी संकुलाच्या आतील भागाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, वाराणसीतील फास्ट ट्रॅक न्यायालयाने मंगळवारी शिवलिंग पूजेला परवानगी देणा-या याचिकेवरची सुनावणी 14 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
Join Our WhatsApp Community