गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ज्ञानव्यापी (Gyanvapi Survey) सर्वेक्षणावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ ऑगस्ट रोजी मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावत एएसआयला सर्वेक्षणाची परवानगी दिली. तसेच उच्च न्यायालयाने तातडीने सत्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे म्हणजेच सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश देखील दिले.
त्यानुसार आता ज्ञानव्यापीचे सर्वेक्षण (Gyanvapi Survey) सुरु झाले असून सलग चौथ्या दिवसाचे सर्वेक्षण देखील पूर्ण झाले आहे. रविवारी सकाळी एएसआयने सर्वप्रथम मुस्लिम बाजूकडून चावी घेऊन व्यास तळघराचे कुलूप उघडले. ते साफ करून एक्झॉस्ट बसवले. त्यानंतर सर्वेक्षणाला सुरुवात झाली.
ज्ञानव्यापीचे (Gyanvapi Survey) तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. व्यास तळघरात एएसआयने मोजमाप घेतले. भिंतींची 3-डी फोटोग्राफी, स्कॅनिंग केले. भिंतींवर आढळलेल्या कलावस्तूंचे मुद्दे तक्त्यामध्ये नमूद केले.
(हेही वाचा – Gadchiroli Accident : सुरजागड लोहखनिज प्रकल्प; उत्खनन करणारे वाहन कोसळून अभियंत्यासह तिघांचा मृत्यू)
कानपूर आयआयटीचे दोन जीपीआर तज्ञही सर्वेक्षण पथकासोबत होते. एक-दोन दिवसांत जीपीआर मशिनद्वारे सर्वेक्षण सुरू होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
मंदिर शैलीतील २० हून अधिक कपाटं
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ज्ञानव्यापीच्या तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण केले. घुमटांच्या सर्वेक्षणादरम्यान (Gyanvapi Survey) पुरातत्व विभागाला गोलाकार छतामध्ये अनेक डिझाइन आढळले. यामध्ये मंदिर शैलीतील २० हून अधिक अलमिरा म्हणजेच भिंतीत बांधलेली कपाटं सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येत आहे.
ज्ञानवापीच्या इमारतीचं थ्रीडी मॅपिंग
संपूर्ण ज्ञानवापी इमारत (Gyanvapi Survey) एकाच वेळी पाहण्यासाठी सॅटेलाईटद्वारे थ्रीडी मॅपिंग केलं जात आहे. रविवारी (६ ऑगस्ट) झालेल्या सर्वेक्षणात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे (ASI) ५८ कर्मचारी, हिंदू पक्षाचे ८ जण आणि मुस्लिम पक्षाचे ३ जण उपस्थित होते. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (ASI) येत्या २ सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण अहवाल सादर करावा लागेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community