Gyanwapi Case : 6 डिसेंबरची पुनरावृत्ती होऊ शकते; असदुद्दीन ओवैसी यांना ज्ञानवापीतील पूजेमुळे पोटशूळ

287
Gyanwapi Case : 6 डिसेंबरची पुनरावृत्ती होऊ शकते; असदुद्दीन ओवैसी यांना ज्ञानवापीतील पूजेमुळे पोटशूळ
Gyanwapi Case : 6 डिसेंबरची पुनरावृत्ती होऊ शकते; असदुद्दीन ओवैसी यांना ज्ञानवापीतील पूजेमुळे पोटशूळ

वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरात (Gyanwapi Case) असलेल्या व्यास तळघरामध्ये हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार वाराणसी न्यायालयाने दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून यावर वाद सुरू होता. वास्तूच्या भोवती उभारण्यात आलेले बॅरिकेड्स काढून टाकण्याची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण केली जावे, असे वाराणसी जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी बजावले आहे. या निर्णयाने एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना पोटशूळ उठला आहे.

(हेही वाचा – Unseasonal Rains : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २,१०९ कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता)

म्हणे, पूजा करण्यास परवानगी देणे चुकीचे

न्यायाधीश साहेबांच्या निवृत्तीचा आज शेवटचा दिवस होता. 17 जानेवारी रोजी रिसीव्हरची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा निकाल दिला. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या कृत्याबाबत मौन तोडत नाहीत, तोपर्यंत हे सर्व घडणार आहे, हे असेच सुरू राहणार आहे. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी देणे चुकीचे आहे. 1993 पासून तुम्ही स्वत: म्हणत आहात की तिथे काहीही होत नाही. अपीलसाठी 30 दिवसांचा अवधी द्यायचा होता, असा थयथयाट ओवैसी यांनी केला आहे.

राममंदिर (ayodhya ram mandir) प्रकरणाचा निर्णय आला, तेव्हाच विश्वासाच्या आधारावर निर्णय दिल्याचे आम्ही त्या वेळीही सांगितले होते. आता या बाबी पुढेही सुरू राहतील. अशाने 6 डिसेंबरची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते… का होऊ शकत नाही? असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत.

30 वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर

व्यास तळघरात पूजेच्या अधिकाराबाबत 2016 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता यावर वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाकडून निकाल देण्यात आला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये नियमितपणे पूजा केली जाणार आहे. मागील 30 वर्षांच्या न्यायालयीने संघर्षानंतर हिंदू पक्षाला मोठे यश मिळाले आहे. नोव्हेंबर 1993 पर्यंत या ठिकाणी पूजा-अर्चना केली जात होती. (Gyanwapi Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.