Swami Govind Dev Giri Maharaj : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा‘अमृत महोत्सव सन्मान सोहळा’

343

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क, दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा सन्मान करण्यात येणार आहे. (Swami Govind Dev Giri Maharaj)

(हेही वाचा – PM Modi In Abu Dhabi : भारत-युएई एकमेकांच्या विकासात भागीदार; पंतप्रधान मोदींकडून भारत- युएई संबंधांना उजाळा)

अनेक मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, शिवसेनेचे खासदार श्री. राहुल शेवाळे, भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार श्री. आशिष शेलार, भाजपचे प्रवक्ते तथा आमदार श्री. अतुल भातखळकर, शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार श्री. भरतशेठ गोगावले, ‘सुदर्शन न्यूज ’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे मुंबई अध्यक्ष श्री. प्रवीण दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित असतील, अशी माहिती ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ (Hindu Janajagruti Samiti) यांच्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. त्यांच्या अमृत महोत्सव सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवर येणार आहेत.

या सोहळ्याला हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. (Swami Govind Dev Giri Maharaj)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.