मुंबईच्या ‘या’ भागात होणार पाणीपुरवठा बंद!

एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागातील परिसरात १३ जुलै २०२१ रोजी रात्री १०.०० वाजेपासून सकाळी १०.०० वाजेपर्यंत काही ठिकाणी कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.

134

पश्चिम उपनगरातील एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या ३ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याने सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने या अडचणींबाबत आवश्यक ती तांत्रिक उपाययोजना हाती घेण्यात येत आहे.  या अंतर्गत पाणीपुरवठ्याशी संबंधीत झडप (बटरफ्लाय व्हॉल्व) येत्या १३ जुलै २०२१ रोजी बदलण्यात येणार आहे. यामुळे एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या ३ विभागातील जुहू, विलेपार्ले, सांताक्रुज व खार (पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम) इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा १३ जुलै २०२१ रोजी बंद राहणार आहे, अगर कमी दाबाने होणार आहे. तरी संबंधित परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी पाण्याचा साठा करुन पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मंगळवार, १३ जुलै रोजी स. १० ते रात्री १० पर्यंत दुरुस्तीचे काम 

मुंबई महानगरपालिकेतर्फे वेरावली जलाशय क्र ३ चे भाग क्र २ चे वांद्रे आऊटलेटवर असलेल्या १२०० मिलि मीटर व्यासाची झडप बदली करण्याचे करण्याचे काम मंगळवार, १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.००  वाजेपासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागातील खालील नमूद परिसरात उपरोक्त नमूद कामाच्या कालावधीत काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे के पश्चिम व के पूर्व  विभागातील खालील नमूद परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

(हेही वाचा : मुंबईत अजूनही नागरिक रस्त्यावर थुंकतात! ७१ जणांवर कारवाई!)

एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व  विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणारा परिसर व पाणी पुरवठा खंडित होणारा परिसर बाबतची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे.

के पश्चिम विभाग

गिलबर्ट हिल – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ८.३० ते ११.१५ वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

जुहू-कोळीवाडा (उर्वरित पुरवठा) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत असणा-या परिसरात सकाळी ८.०० ते ९.१५ वा. या कालावधी दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

चार बंगला – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.१५ ते २.१० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

विलेपार्ले (पश्चिम) – जे.व्ही.पी.डी., नेहरु नगर – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.५५ वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील.

(हेही  वाचा : ऑक्सिजन प्लांटसाठी आधी काढल्या निविदा, नंतर उभारले सीएसआर निधीतून!)

के पूर्व विभाग – (विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व विभाग)

विलेपार्ले (पूर्व)  (संपूर्ण विलेपार्ले पूर्व डोमेस्टिक एअरपोर्ट) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

सहार मार्ग, ना. सी. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली गावठाण, तेली गल्ली, साईवाडी, जिवा महाले मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.०० ते १०.३० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

एच पश्चिम विभाग (खार ते सांताक्रुझ पश्चिम)

खोतवाडी, गझदरबंध, एस.व्ही. मार्ग (खार), लिंकींग रोड (खार), सांताक्रुझ (पश्चिम), खार (पश्चिम) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते ९.०० वाजेपर्यंत असणा-या परिसरात सकाळी ६.३० ते ९.०० या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा होईल.

एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागातील सदर परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, सदर कामाच्या दरम्यान दिनांक १३ जुलै २०२१ रोजी रात्री १०.००  वाजेपासून सकाळी १०.०० वाजेपर्यंत काही ठिकाणी कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.

(हेही वाचा : मुंबईतील उद्यान, मैदानांची विकासकामे आता प्राधान्य क्रमानुसारच!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.