H3N2 InFluenza cases In India: राज्यातील H3N2 चा पहिला रुग्ण दगावला

89

देशात H3N2 व्हायरसने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात सध्या 170 हून अधिक रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित आहेत. देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एमबीएमचे शिक्षण घेणा-या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने मृत्यू झालेला तरुण मागील आठवड्यात कोकणात फिरायला गेला होता. कोकणातून फिरुन आल्यावर तो आजारी पडला होता. त्याला सर्दी, ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न् झाले होते. त्यानंतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणीसह H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसची चाचणीही करण्यात आली. त्यातही तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

( हेही वाचा: Meta Layoff: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने १० हजार कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता )

तरुणाचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर 

महाराष्ट्रातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा हा पहिला मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आता चाचणी केली जाणार असून फिरायला गेलेल्या सर्वांची चाचणी केली असून, त्यांचे अहवाल प्रलंबित असून त्याची प्रतीक्षा केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. अशातच आता अहमदनगरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.