कोरोनाची २ वर्षे अनुभवल्यावर जरा कुठे काही महिने भारतीयांनी मोकळा श्वास अनुभवाला होता, आता पुन्हा भरतीच्या तोंडावर मास्क चढणार आहे. कारण भारतात H3N2 इन्फ्लुएंझा या विषाणू संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या इन्फ्लुएंझामुळे दोन जण दगावले आहेत. त्यानंतर आता देशभरात या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने एक बैठकही बोलावली होती. या बैठकीनंतर नीती आयोगाने सगळ्यांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात सर्दी, ताप, खोकला होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण वाढले आहे. H3N2 या व्हायरसमुळे हे होते आहे. ICMR ने ही माहिती दिली असून काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे. तसेच ताप आला तर दुर्लक्ष करू नका असेही म्हटले आहे. H3N2 इन्फ्लुएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोरोना प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करावे, असे सांगितले आहे.
(हेही वाचा सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत कोठडी; न्यायालयात अनिल परबांचा नमोल्लेख)