मुंबईत जी २० परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाच्या (Disaster Risk Reduction) बैठकीला २३ मे २०२३ पासून प्रारंभ होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिका मुख्यालयास कार्यगटाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या भेटीच्या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयातील कर्मचा-यांना २३ मे २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.
जी २० परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाचे प्रतिनिधी
महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाचा अभ्यास दौरा असून ते महानगरपालिका इमारतीचा हेरिटेज वॉकमध्येही भाग घेऊन या इमारतीची पाहणी करणार आहेत. या भेटीच्या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयातील कर्मचा-यांना २३ मे २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासनाने जाहीर केली. ज्या विभागातील तथा खात्यातील कर्मचारी यांनी थांबण्याची आवश्यकता आहे, अशा कर्मचा-यांना मुंबई पोलीसांमार्फत पास देण्यात येणार आहेत. मात्र, पोलिसांकडून प्राप्त झालेला पास नसलेल्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिका इमारतीत थांबण्यास पोलीसांमार्फत मज्जाव करण्यात येईल, असेही म्हटले आहे. दरम्यान जी २० परिषदेच्या शिष्टमंडळाच्या भेटीच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिका सुरक्षा विभाग तसेच आपत्कालिन विभाग यांच्या माध्यमातून मॉकड्रिल घेण्यात येत आहे. या शिष्टमंडळांमध्ये १२० अधिकारी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या तुकड्या तयार करून त्याप्रमाणे मॉकड्रिल करून पूर्वतयारीचा आढावा घेतला.
Join Our WhatsApp Community