RPF : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

150
RPF : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
RPF : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

स्त्रियांना रेल्वेतून सुरक्षित आणि निर्वघ्नपणे प्रवास करता यावा याकरिता रेल्वे पोलीस दलाच्या (RPF) 25 सदस्यीय संघाने आज दिल्ली हाफ मॅरेथॉन २०२३ मध्ये भाग घेतला. भारतीय रेल्वेमार्गावर (RPF) महिलांची सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने रेल्वे पोलीस दलाच्या विविध उपक्रमांबाबत नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मेरी सहेली’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वे हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रेल्वे संरक्षण दल (RPF) महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तत्परतेने काम करत आहे. २०२३ या वर्षात आरपीएफने रेल्वेच्या धोकादायक परिस्थितीतून ८६२ महिलांची सुटका केली. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ या उपक्रमांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेने एकटीने प्रवास करणाऱ्या २,८९८ मुलींची सुटका केली.

(हेही वाचा – Punjab CM : भगवंत मान हे पंजाब साठी नव्हे तर केजरीवालसाठी काम करतात ,सुखबीर सिंग बादल यांचा आरोप )

‘मेरी सहेली’ उपक्रमात काम करणारे पथक भारतातील दूरवर पसरलेल्या रेल्वेमार्गाच्या जाळ्यावर कार्यरत असून लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून एकट्याने प्रवास करणाऱ्या असंख्य महिलांना सहाय्य आणि सुरक्षा प्रदान करत आहेत. यासाठी रेल्वे पोलीस दलाच्या महिला कर्मचारी पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने काम करतात.

रेल्वे पोलीस दलाच्या संघाकडून रविवार, १५ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे अर्ध मॅरेथॉनमध्ये घेतला. यामध्ये भारताच्या विविध भागांतून आलेल्या पोलीस महासंचालकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यामध्ये पंजाब, पश्चिम बंगाल, आणि महाराष्ट्रातील चार महिला रेल्वे पोलीस दल कर्मचारी सहभागी झाले होते. २५ सदस्यीय संघाने रेल्वे पोलीस दलाने या उपक्रमाचे प्रतिनिधीत्व केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.