लालपरी पुन्हा धावण्यास सज्ज, वाचा ही महत्त्वाची बातमी!

119

एसटी कर्मचा-यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने एसटी कर्मचा-यांना 22 एप्रिलचा अल्टिमेटम दिल्यानंतर, आता एसटी संपामध्ये सहभागी जवळपास निम्मे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांमध्ये न अडकता कर्मचा-यांना कामावर हजर करुन घेण्यात येत आहे. राज्यात सर्व आगारांत मिळून 16 हजारांहून अधिक फे-या मार्गस्थ करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गुरुवारी दिली. तब्बल सहा महिन्यांनंतर एसटी पूर्वपदावर येण्यास सज्ज झाली आहे.

इतके कर्मचारी झाले कामावर हजर

आता सध्या 21 हजार 595 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. संपकाळात राज्यातील 250 आगार सुरु होते, पण तिथून एसटी धावत नव्हत्या. आता कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्याने एसटी सुरळीत धावू लागली आहे. बुधवार अखेर राज्यात विविध मार्गांवर 16 हजार फे-या मार्गस्थ करण्यात आल्या. सध्या या फे-यांच्या माध्यमातून रोज सुमारे 13 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळत आहे.

( हेही वाचा: सरकार वेळकाढूपणा करत आहे; न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले )

कामावर पुन्हा घेण्याची प्रक्रिया सुरु

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हजेरीपटावर एकूण 81 हजार 683 कर्मचारी आहेत. गुरुवारअखेर एकूण 41 हजार 462 कर्मचारी रुजू झाले आहेत. 12 आणि 13 एप्रिलला, 2 हजार 971 कर्मचारी कामावर परतले. अनेक कर्मचारी सध्या कामावर परतण्यासाठी संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कर्मचा-यांना पुन्हा कामावर घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती एसटी महामंडळातील जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.