Hall Ticket For 10th Exam: दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकिट बुधवारपासून ऑनलाईन उपलब्ध होणार

329
Hall Ticket For 10th Exam: दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकिट बुधवारपासून ऑनलाईन उपलब्ध होणार
Hall Ticket For 10th Exam: दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकिट बुधवारपासून ऑनलाईन उपलब्ध होणार

दहावी, बारावीच्या मुलांसाठी फेब्रुवारी, मार्च महिना महत्त्वाचा असतो. यावर्षीपासून राज्य शिक्षण मंडळाने काही महत्त्वाचे बदल परीक्षेत केले आहेत. हे बदल विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरतील.

बोर्डाने यंदा विद्यार्थी आणि पालकांकडून झालेल्या मागणीनुसार, परीक्षेचा वेळ १० मिनिटांनी वाढवून दिला आहे तसेच बोर्डाने विद्यार्थ्यांना हॉल तिकिट (Hall Ticket For 10th Exam) उपलब्ध करून दिले आहे. दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट बुधवार, (३१ जानेवारी) पासून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

(हेही वाचा  – Rafael Nadal Racquet : राफेल नदालच्या फ्रेंच ओपन जिंकून दिलेल्या रॅकेटला मिळाले १.११ लाख अमेरिकन डॉलर)

ऑनलाइन उपलब्ध होणार…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बुधवारपासून दहावीचे हॉल तिकिट जारी करणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तसेच लेखी परीक्षेला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उद्यापासून (बुधवार) हॉल तिकिट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. या हॉल तिकिटासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे आदेश बोर्डाने विद्यालयांना दिले आहे.

महत्त्वाचे बदल…
– सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू होणार असले, तर विद्यार्थ्यांना १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर यावे लागेल तसेच दुपारी ३ वाजता परीक्षा असेल तर विद्यार्थ्यांना २.३० वाजता परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे, असे परीक्षा मंडळातर्फे कळवण्यात आले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे.
– परीक्षेचा वेळ १० मिनिटांनी वाढवून दिला आहे.
– सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत काही बदल करण्यात आले आहेत. सीबीएसई बोर्ड आता विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी देणार नाही तसेच श्रेणीसुद्धा देणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढू नये, यामुळे हा निर्णय घेतला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.