Israel-Hamas Conflict: हमासकडून नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर, इस्रायलच्या पंतप्रधानांचे वक्तव्य

125
Israel-Hamas Conflict: हमासकडून नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर, इस्रायलच्या पंतप्रधानांचे वक्तव्य
Israel-Hamas Conflict: हमासकडून नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर, इस्रायलच्या पंतप्रधानांचे वक्तव्य

तब्बल सव्वा महिना इस्रायल आणि हमास संघर्ष (Israel-Hamas Conflict)  सुरू आहे. दिवसेंदिवस या संघर्षात वाढ होत असून नुकतच पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी हमासबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिओर हैट यांनी इस्त्रायलने गेल्या महिन्यात झालेल्या हमास हल्ल्यातील मृतांची संख्या १,४०० वरून १,२०० पर्यंत सुधारित केली असल्याची माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Israel-Hamas conflict: हमासविरोधात लढणाऱ्या FAUDA वेबसिरीजच्या क्रू मेंबरचा मृत्यू)

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इस्रायल गाझामधील नागरिकांना इजा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि त्यांना लढाईचे क्षेत्र सोडण्याचे आवाहन करत असताना, हमास-इसिस त्यांना सुरक्षित भागात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. हमास माणुसकीच्या विरोधात जाऊन आमच्या स्त्रिया, मुले आणि वृद्धांना क्रूरपणे ओलीस ठेवत आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.