Hanging Garden : मुंबईकरांनो, हँगिग गार्डनमध्ये जाण्यापूर्वी ‘हे’ वाचा, ब्रिटिशकालिन जलाशयाची पुनर्बांधणी करणार

विकासकामाच्या प्रक्रियेत जवळपास २०० झाडांचे पुनर्रोपण

152
Hanging Garden : मुंबईकरांनो, हँगिग गार्डनमध्ये जाण्यापूर्वी 'हे' वाचा, ब्रिटिशकालिन जलाशयाची पुनर्बांधणी करणार
Hanging Garden : मुंबईकरांनो, हँगिग गार्डनमध्ये जाण्यापूर्वी 'हे' वाचा, ब्रिटिशकालिन जलाशयाची पुनर्बांधणी करणार

मुंबईची ओळख असलेले हँगिग गार्डन (Hanging Garden) आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. कमला नेहरू पार्क आणि फिरोजशाह मेहता उद्यानास दर महिन्याला लाखो पर्यटक भेट देत असतात. तब्बल १३६ वर्षांचा इतिहास असलेल्या या स्थानाचा विकास होणार आहे. मलबार हिल येथील टेरेस गार्डनखाली असणाऱ्या ब्रिटिशकालीन जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास ७ वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या काळात हँगिग गार्डन परिसर टप्प्याटप्प्याने बंद केला जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

हँगिग गार्डनच्या परिसरात होणाऱ्या विकासकामाच्या प्रक्रियेत जवळपास २०० झाडांचे पुनर्रोपण केले जाईल. हँगिग गार्डनचा परिसर मुंबईतील उंचावरच्या भागांपैकी एक आहे. ब्रिटिशकाळात दक्षिण मुंबईच्या परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी जलाशय बांधण्यात आला होता. हँगिंग गार्डनचा ६९८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून नोव्हेंबर २०२३पासून हँगिग गार्डनच्या कामाला सुरुवात होईल.

(हेही वाचा – Lentils Price Hike : मसूर डाळीच्या कॅनडातून होणाऱ्या आयातीवर परिणाम; किमतीत वाढ होणार का ?)

मलबार हिल परिसरात असलेले हँगिग गार्डन आणि म्हातारीचा बूट हे पर्यटकांच्या आणि बच्चे कंपनीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हँगिग गार्डन हा परिसर जुन्या मुंबईची ओळख आहे, मात्र आता नव्या मुंबईच्या विकासाच्या प्रक्रियेत ही ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे तसेच या परिसरातील स्थानिक नागरिकांचा या विकासकामाला विरोध होत आहे. त्यामुळे मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.