अग्निशमन दलाने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रातील अटी आणि शर्ती यांची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमातील तरतुदीनुसार कांदिवली (प) येथील हंसा हेरीटेज इमारतीचे अध्यक्ष अन् सचिव यांना ‘एम्.आर्.टी.पी.’च्या अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे, तसेच विकासक, अध्यक्ष, सचिव आणि आर्किटेक्ट यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी लागलेली आग
कांदिवली येथील हंसा इमारतीला लागलेल्या आगीच्या संदर्भात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी प्रश्न विचारला होता. यावरील लेखी उत्तरात एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी लागलेल्या आगीत २ ज्येष्ठ महिलांचा मृत्यू झाला. बृहन्मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने ७ एप्रिल २०१४ या दिवशी ‘ना हरकर’ प्रमाणपत्रातील अटीनुसार स्वतंत्र वीज पुरवठा सबस्टेशन आणि स्टॅण्डबाय पंप बसवणे ही गोेष्ट इमारत पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करण्यापूर्वी करणे आवश्यक होते, तसेच सदर इमारतीस पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.
(हेही वाचा महाराष्ट्र भाजप संपवण्याची काय होती टूलकीट? देवेंद्र फडणवीसांचा पुराव्यांसह गौप्यस्फोट)
Join Our WhatsApp Community