PM Narendra Modi यांच्याकडून देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

37
PM Narendra Modi यांच्याकडून देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हर हर महादेव… म्हणत देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर (एक्स) शुभेच्छा संदेश जारी केला आहे.

(हेही वाचा – Beed Santosh Deshmukh Murder Case : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त)

आपल्या संदेशात पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशी या तिथीला साजरा होणारा महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या भगवान शिवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते.

(हेही वाचा – Plane Crash : सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळले, १० जणांचा मृत्यू)

पुराणांतील उल्लेखांनुसार, या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन झाले, तसेच शिवशंकरांनी तांडवनृत्य केले, असे मानले जाते. ‘भगवान भोलेनाथांना समर्पित महाशिवरात्री या पवित्र सणाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हा दिव्य प्रसंग तुम्हा सर्वांना आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो. विकसित भारताचा संकल्प बळकट करो, असे पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.