नव्या वर्षात तुमच्या ‘या’ सुट्ट्या जाणार वाया! पहा संपूर्ण यादी…

जगभरात मोठ्या उत्साहाने नव्यावर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. दरवर्षी नववर्ष आले की, आपण चालू वर्षात किती सुट्ट्या आहेत याची यादी पाहतो. महाराष्ट्र सरकारने यंदाच्या २४ अधिकृत सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बऱ्याच वेळा काही सण आठवड्याच्या शेवटी किंवा वीकेंडला येतात यामुळे हक्काच्या सुट्ट्या वाया जातात. यावर्षी सुद्धा लोकांच्या अनेक सुट्ट्या वाया जात आहे. यंदा किती सुट्ट्या वाया जााणार आहेत याची संपूर्ण यादी पाहूयात…

( हेही वाचा : यंदा कर्तव्य आहे, तर मुहूर्त जाणून घ्यावे )

शनिवार-रविवारी आलेल्या सुट्ट्या…

१४ जानेवारी २०२३ : मकर संक्रांत, पोंगल – शनिवार

नव्या वर्षाची सुरुवात मकर संक्रात या पहिल्या सणाने होणार आहे. यावर्षी संक्रांतीला शनिवार येत असल्याने एक सुट्टी कमी झाली आहे. पोंगल सुद्धा याच दिवशी येणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातील ही सुट्टी कमी झाली आहे.

२२ एप्रिल २०२३ : ईद-उल-फित्र – शनिवार

२२ एप्रिलला ईद आहे या दिवशी सुद्धा शनिवार आहे त्यामुळे फाईव्ह डे वर्किंग असणाऱ्यांची सुट्टी वाया गेली आहे.

१२ नोव्हेंबर २०२३ : दिवाळी – रविवार

दिवाळी सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. परंतु यंदा नेमकी दिवाळी रविवारी असणार आहे. त्यामुळे दिवाळीची एक सुट्टी रविवारी आल्यामुळे कमी होणार आहे.

१९ नोव्हेंबर २०२३ : छठपूजा – रविवार

दिवाळीनंतर उत्तर भारतात साजरा केला जाणारा छठपूजा या सणादिवशी यंदा रविवार आला आहे. त्यामुळे ही सुट्टी सुद्धा वाया गेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here