Har Ghar Tiranga : मुंबईतील २२४ डाक कार्यालये आणि पाच रेल्वे स्थानकांवर मिळणार राष्ट्रध्वज

163
Har Ghar Tiranga : येत्या १३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवा; मुंबई महापालिकेचे आवाहन

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव समारोपानिमित्त ‘माझी माती-माझा देश’ अभियान राबवले जात आहे. याचा एक भाग म्हणून रविवार १३ ऑगस्ट २०२३ ते मंगळवार, १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत संपूर्ण मुंबई महानगरात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांना सहजपणे राष्ट्रध्वज खरेदी करता यावा याकरीता मुंबईत डाक विभागाची (पोस्ट ऑफिस)२२४ कार्यालये, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, वांद्रे, बोरिवली, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला या पाच रेल्वे स्थानकांवर राष्ट्रध्वज खरेदी करता येवू शकतील. सर्व मुंबईकरांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईकरांना केले आहे.

देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ गत वर्षभरापासून साजरा करण्यात येत आहे. आता हा महोत्सव समारोपाकडे वाटचाल करीत आहे. यानिमित्ताने ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाने अमृत महोत्सवाची सांगता होत आहे. या अभियानात शिलाफलकम, पंच प्रण (शपथ), वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजवंदन, मिट्टी यात्रा असे उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. अभियानाचा एक भाग म्हणून, दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) म्हणजेच ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Investment In Maharashtra : ह्युंदाई कंपनी महाराष्ट्रात करणार ४ हजार कोटींची गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प)

येत्या १३, १४ आणि १५ ऑगस्ट या तीन दिवशी नागरिकांना आपल्या घरी/इमारतीवर दिवसा व रात्री (अखेरच्या दिवशी सूर्यास्तापर्यंत) राष्ट्रध्वज (Har Ghar Tiranga) फडकवता येईल. मात्र, सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती, तसेच अंगणवाड्या, शाळा, रुग्णालये यासह सर्व शासकीय संस्थांवर राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार फक्त दिवसा ध्वज फडकवावा. म्हणजेच शासकीय कार्यालये व संस्थांना रात्री तिरंगा फडकविण्यास परवानगी नाही.

मागील वर्षी महानगरपालिकेने स्वतः राष्ट्रध्वज (Har Ghar Tiranga) खरेदी करुन सर्व मुंबईकरांना घरोघरी पोहोच केले होते. तसेच हे ध्वज जपून ठेवण्याचे आवाहनही केले होते. ज्या नागरिकांकडे राष्ट्रध्वज तिरंगा आहेत, त्यांनी आपल्या घरी तिरंगा फडकवावा. दज्यांच्याकडे राष्ट्रध्वज नाही, त्यांना ध्वज खरेदी करण्याची सुविधा विविध माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण मुंबईत सुमारे २२४ डाक कार्यालयांमध्ये (पोस्ट ऑफिस) शासनाने निश्चित करून दिलेल्या दराने राष्ट्रध्वज उपलब्ध आहेत. म्हणजेच सर्व नागरिकांना आपल्या घरानजिक टपाल कार्यालयात जावून ध्वज खरेदी करता येईल.

त्याचप्रमाणे मुंबईतील पाच मुख्य रेल्वे स्थानकांवरही तिरंगा ध्वज (Har Ghar Tiranga) विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, वांद्रे, बोरिवली, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, https://mumbaicity.gov.in या संकेतस्थळावर देखील मुंबई शहर जिल्हाधिकारी यांचेवतीने तिरंगा ध्वज पुरवठादारांची नावे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

सन्मानाने अशाप्रकारे फडकवा राष्ट्रध्वज

यंदा देखील दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियानात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावे. राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या घरी फडकवताना केशरी रंगाची पट्टी वरच्या दिशेने तर हिरव्या रंगाची पट्टी खालच्या दिशेने अशा योग्य स्थितीत राष्ट्रध्वज फडकवावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.