दिवाळीनिमित्त नातेवाईकांकडे जाण्यासाठी नागरिक नेहमीच रेल्वे प्रवासाला पसंती देतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणा-यांची संख्या देखील वाढली आहे. त्याचा परिणाम रेल्वे स्टेशनवर विकल्या जाणा-या पाण्याच्या बाटल्यांवरही झाला आहे. रेल्वे स्टेशन्सवरील स्टॉलवर विकल्या जाणा-या रेल नीरच्या बाटल्यांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे.
त्यामुळेच रेल मध्य आणि हार्बर रेल्वेवरील काही स्थानकांवर रेल नीरच्या बाटल्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. वाढती मागणी आणि पुरवठ्यात होणारी घट यामुळे 29 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान हा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. आयआरसीटीकडून याबाबतचे नोटिफिकेशन मध्य रेल्वेला देण्यात आले आहे.
गर्दीमुळे परिणाम
रेल नीरचे अंबरनाथ येथील एका प्लांटमध्ये उत्पादन केले जाते जिथून त्याचे वितरण केले जाते. सणासुदीच्या विशेष गाड्या आणि रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी यामुळे रेल नीरची मागणीही वाढत आहे. प्रीमियम पॅसेंजर ट्रेन्स आणि काही वातानुकूलित डब्यांमध्ये रेल्वेकडून प्रत्येक प्रवाशाला रेल नीर पुरवले जाते, ज्यात तिकीट खर्चाचा समावेश होतो. उपनगरीय लोकल प्रवाशांसाठीही, स्थानकांवर उपलब्ध पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचा हा एकमेव पर्याय आहे.
(हेही वाचाः कोहलीच्या रुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेल प्रशासनाने मागितली माफी, केली मोठी कारवाई)
या स्थानकांवर तुटवडा
मुंबई डिव्हिजन व्यतिरिक्त भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, सोलापूर, दौंड आणि अहमदनगर या स्थानकांवरही १५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वे नीरचा तुटवडा जाणवणार आहे. IRCTC 14 हजार 500 कार्टन्स पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे उत्पादन करते. प्रत्येक कार्टनमध्ये 1 लिटरच्या 12 पाण्याच्या बाटल्या असतात. हे कार्टन्स स्थानकांवरील स्टॅटिक केटरिंग युनिट मालकांना पुरवले जातात आणि वितरित केले जातात. बर्याचदा स्थिर युनिट्स अतिरिक्त स्टॉकची मागणी करण्यात येते, त्यामुळे IRCTCला वेळेवर पुरवठा आणि वितरण करणे कठीण होते, असे IRCTC ने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community