मुंबईतील हार्बर लोकल सेवेचा पुन्हा एकदा तांत्रिक कारणामुळे खोळंबा झाला आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरीव सर्व लोकल सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. साधारण साडेतीन वाजल्यापासून ही लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावरील सेवा बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सायंकाळच्या वेळी कार्यालये सुटल्यावर प्रवाशांची मोठी गर्दी स्थानकांवर होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाल्या आहेत. सध्या हा तांत्रिक अडथळा दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तांत्रिक बिघाडामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या हार्बर लोकल गाड्यांवर परिणाम झाला आहे. सेवा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागेल असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
https://twitter.com/HindusthanPostH/status/1614943602177880064?t=RAfFD_hHb8tOhO23Dzhf8w&s=19
Join Our WhatsApp Community