Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे पाकिस्तान कनेक्शन ? महत्त्वाची माहिती समोर

78
Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे पाकिस्तान कनेक्शन ? महत्त्वाची माहिती समोर
Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे पाकिस्तान कनेक्शन ? महत्त्वाची माहिती समोर

भारत आणि कॅनडामधील संबंध ताणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सने दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात हत्या घडवून आणली. (Hardeep Singh Nijjar) आयएसआयने निज्जरला मारण्यासाठी गुन्हेगारांची नियुक्ती केली आहे. आयएसआय आता निज्जरच्या जागी दुसऱ्या माणसाच्या शोधात आहे. खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांना एकत्र आणण्याचाही प्रयत्न आयएसआय करत आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

(हेही वाचा – Ganesh Visarjan 2023 : गणेश विसर्जनासाठी २० हजार मुंबई पोलीस सज्ज)

कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर पार्किंग क्षेत्रात १८ जून रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली. खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले आहेत. निज्जरची हत्या भारतानेच केली असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन  ट्रुडो यांनी केल्याने वाद चिघळला आहे. निज्जरच्या हत्येचा कट पाकिस्तानात रचला असल्याचे वृत्त समोर आले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. १८ जून रोजी कॅनडामध्ये हरदीपसिंग निज्जर याची हत्या झाली. ही हत्या भारताने घडवून आणल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भर संसदेत केला होता. (Hardeep Singh Nijjar)

भारत सरकारने कॅनडाला मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची माहिती

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “मागील काही वर्षात कॅनडात अनेक संघटित गुन्हे घडले. फुटीरतावादी शक्तींकडून संघटित गुन्हे आणि हिंसाचार झाला. हे सर्व एकमेकांमध्ये फार मिसळून गेले आहेत. त्यामुळेच आम्ही तपशील आणि माहितीवर बोलत आहोत. भारत सरकारने कॅनडाला मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची आणि तेथून बाहेर देशात गुन्हे करणाऱ्या नेत्यांची माहिती दिली आहे. भारताने मोठ्या संख्येने प्रत्यार्पणाची विनंती केली आहे.” (Hardeep Singh Nijjar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.