Accident News: हरदोई अपघातात रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडले, १० जण ठार; मुख्यमंत्री योगी यांनी व्यक्त केला शोक

82
Accident News: हरदोई अपघातात रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडले, १० जण ठार; मुख्यमंत्री योगी यांनी व्यक्त केला शोक
Accident News: हरदोई अपघातात रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडले, १० जण ठार; मुख्यमंत्री योगी यांनी व्यक्त केला शोक

हरदोई (Hardoi Accident ) येथे ट्रकने रिक्षाला चिरडले (Accident News) आहे. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. तर, ५ जण गंभीर आहेत. मृतांमध्ये 6 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षा दूरवर जाऊन पलटली. रिक्षाचे संपूर्ण छत उडून गेले. आत बसलेले प्रवासी बाहेर पडले. रस्त्यावर मृतदेह विखुरले होते. हा अपघात बुधवारी (६ नोव्हें.) दुपारी बिलग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोशनपूर गावाजवळ घडला. (Accident News)

…त्यामुळेच हा अपघात झाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रिक्षा बिलग्रामकडे जात होती. त्यावेळी अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा उलटली. त्यानंतर ट्रकने रिक्षाला चिरडले. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. एसपी नीरज कुमार जदौन म्हणाले, दुपारी 12.30 वाजता अपघात झाल्याची माहिती मिळाली. मी घटनास्थळी पोहोचलो. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. ऑटोमध्ये 15 जण होते. त्यामुळेच हा अपघात झाला. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. (Accident News)

मृतांपैकी फक्त दोघांची ओळख पटली आहे. माधुरी देवी (वय 40, रा. माळ) आणि सुनीता, पटियान पूर्वा गावातील रहिवासी अशी त्यांची नावे आहेत. जखमींमध्ये संजय रा.पहुटेरा, रमेश रा.अलीगड पोलीस स्टेशन बिलग्राम, विमलेश रा.सरा सफारा, आनंद रा.पाहुटेरा यांचा समावेश आहे. एका जखमीची ओळख अद्याप पटलेली नाही. (Accident News)

मुख्यमंत्री योगी यांनी व्यक्त केला शोक
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, ऑटोमध्ये 15 प्रवासी होते. रिक्षा खूप वेगाने जात असताना अचानक उलटली. एवढा भीषण अपघात पाहून आम्हाला काहीच समजले नाही. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतांमध्ये लहान मुलेही होती. असं प्रत्यक्षदर्शी म्हणाले आहेत. तर, मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. जखमींवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. (Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.