राज्यातील तरुणांचे प्रश्न सभागृहात कायम मांडणारे आमदार सत्यजीत तांबे यांनी शुक्रवारी सभागृहात लहान मुले आणि (Drug free Maharashtra) विद्यार्थ्यांच्या संदर्भातील महत्त्वाच्या विषय हाती घेऊन संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यसरकारने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतली असताना किरणामाल आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिंक (Energy drink) हे एखाद्या ड्रग्ज येवढेच घातक असल्याचे आमदार तांबे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर सभापती नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त करत येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याचे आदेश संबंधित मंत्री आणि प्रशासनाला दिले. (MLC Satyajeet Tambe)
जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री असल्याने शाळेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहे. राज्यामध्ये शाळा परिसरातील कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. आमदार सत्यजीत तांबेंनी मांडलेल्या मुद्यावर मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Minister Dharmarao Baba Atram) यांनी शाळा परिसरात ५०० मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे जाहीर केले. (MLC Satyajeet Tambe)
(हेही वाचा – Har Ghar Nal Yojana 2024 : ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध)
राज्यातील नाशिक मुंबईसह सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) तसेच नशेच्या गोळ्या बाजारात विक्रीसाठी सहज उपलब्ध आहेत. तरुण वर्गासोबतच लहान मुले देखील याकडे आकर्षित होत आहेत. शाळा व महाविद्यालय परिसरात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात कॅफेनयुक्त पेयांचा (Energy drink) प्रसार केला जातो. एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवर देखील सरकारने बंदी घालावी तसेच शाळा परिसरात कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी घालून योग्य कार्यवाही करावी. याबाबत संबधित अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेण्यात यावी अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. (MLC Satyajeet Tambe)
(हेही वाचा – Pooja Khedkar यांचा आणखी एक उद्दामपणा; चोराला सोडविण्यासाठी अधिकाऱ्याला फोन)
एनर्जी ड्रिंक्समुळे होणारे दुष्परिणाम कोणते?
-एनर्जी ड्रिंक्समध्ये वापरण्यात येणारे कॅफेन शरीराला अत्यंत घातक
-कॅफेनचे जास्त सेवन केल्यामुळे नशा येऊन मेंदू, किडनी, मज्जारज्जू यावर विपरीत परिणाम होतो.
-अस्वस्थता, निद्रानाश, प्रजनन समस्या, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि चिडचिडेपणा या व्याधींचा धोका निर्माण होतो.
(हेही वाचा – Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!)
वय वर्ष १८ खालील मुलांसाठी विक्री नाही.
स्टिंग (Sting Energy drink) आणि इतर काही एनर्जी ड्रिंक्सची किरणामालाच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. वस्तूता हे एनर्जी ड्रिंक्स १८ वर्षाखालील मुलांनी सेवन करू नये असे लिहिण्यात आलेले असते मात्र विक्रेते याकडे साफ दुर्लक्ष करून सरसकट वयातील मुलांना याची विक्री करतात. अनेक पालकांमध्ये देखील याबाबत जागरूकता नसल्याने आढळून आल्याने विक्रीचे प्रमाण अधिक आहे. (MLC Satyajeet Tambe)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community