कर्णावती (गुजरात) येथील ‘वन्दे भारत’ (Vande Bharat) रेल्वेगाडीतून सुटकेस चोरीच्या प्रकरणी अटकेत असलेल्या मेजर हर्षित चौधरीच्या अन्वेषणातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 5 सप्टेंबर 2024 रोजी अहमदाबाद येथून अटक करण्यात आलेला मेजर हर्षित चौधरी हा शहबाज मुश्ताक अली खान असल्याचे समोर आले आहे. त्याने बनावट आधारकार्ड सादर करून हर्षित चौधरी याच नावाचे रेल्वेचे आरक्षण केले होते.
(हेही वाचा – Chemical Gas Leakage : अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कंपनीतून गॅस गळती; प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न)
पोलिसांनी हे ओळखपत्र जप्त केले आहे. या ओळखपत्रात शहबाजचे छायाचित्र आहे; परंतु नाव हर्षित चौधरी लिहिले आहे. तसेच त्याचे पद मेजर असे आहे. त्याने बनावट आधारकार्डवर राजस्थानचा रहिवासी असल्याचे लिहिले असले, तरी तो मूळचा उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो अलीगढमधील मौलाना आझाद नगर येथे रहातो.
अन्वेषणादरम्यान उघड झाले की, शहबाज मुश्ताक अली खान याने या बनावट ओळखपत्रांवर देशांतर्गत विमानाने 3 वेळा आणि रेल्वेनेही प्रवास केला आहे. शहबाज मुश्ताक अली खान हा विवाहित असून त्याला 2 मुले आहेत. शहाबाजचे वडील मुश्ताक अली खान हे भारतीय लष्करातून निवृत्त झाले आहेत, तर एक भाऊ भारतीय हवाई दलात आहे. या प्रकरणी आरोपीला शहाबाजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Vande Bharat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community