पक्ष बदलताच Harshvardhan Patil यांनी केले वक्फ बोर्डाचे समर्थन

159
पक्ष बदलताच Harshvardhan Patil यांनी केले वक्फ बोर्डाचे समर्थन
पक्ष बदलताच Harshvardhan Patil यांनी केले वक्फ बोर्डाचे समर्थन

७ ऑक्टोबर रोजी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला. या वेळी पक्षप्रवेशाच्या भाषणाच्या वेळीच हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी सुप्रिया सुळे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. या वेळी त्यांनी वक्फ बोर्डाचेही समर्थन केले आहे.

(हेही वाचा – Gang Rape Case : अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; युसूफ, मोहम्मद अनस आणि मोमेन अलीला अटक)

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, तुम्ही ज्या पद्धतीने संसदेत भाषण करता, त्याचा मला अभिमान आहे. संसदेत वक्फ बोर्डाचा (Waqf Board) विषय तुम्ही तडफेने मांडला, त्यामुळे सरकारला ते विधेयक संसदीय समितीकडे पाठवावे लागले. तुम्ही बोलला नसता, तर गोंधळात संसदेत ते विधेयक संमतही झाले असते.

अशा शब्दांत पक्षप्रवेशाच्या वेळीच हर्षवर्धन पाटील यांनी मुसलमान व्होट बँकेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत अदृश्य मदत केल्याचाही गौप्यस्फोट केला.

इंदापूर (Indapur) येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. सोमवार, 7 ऑक्टोबर रोजी झाला. या वेळी इंदापूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी, विविध संस्था, ग्रामपंचायती, सोसायटी, दूध संस्था यांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, महिला यांनीही पक्षात प्रवेश केला. या वेळी अंकिता पाटील- ठाकरे, अ‍ॅड. शरद जामदार, राजवर्धन पाटील, लालासाहेब पवार, देवराज जाधव, मुरलीधर निंबाळकर, अ‍ॅड. कृष्णाजी यादव हेही उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.