Haryana Bus Fire: हरियाणामध्ये भाविकांच्या बसला भीषण आग; १० जणांचा मृत्यू, २४ जखमी

186
Haryana Bus Fire: हरियाणामध्ये भाविकांच्या बसला भीषण आग; १० जणांचा मृत्यू, २४ जखमी
Haryana Bus Fire: हरियाणामध्ये भाविकांच्या बसला भीषण आग; १० जणांचा मृत्यू, २४ जखमी

हरियाणातील नूंह येथे कुंडली मानेसर-पलवल एक्सप्रेस (Haryana Bus Fire) वेवर भीषण दुर्घटना झाली आहे. भाविकांनी भरलेल्या टूरिस्ट बसला आग लागली. या दुर्दैव घटनेत १० लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर २४ हून अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. मध्यरात्री 2च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. (Haryana Bus Fire)

(हेही वाचा –CM Eknath Shinde : ‘गर्व से कहो हम हिंदू है’, बोलायची हिमंत उद्धव मध्ये राहिली नाही!)

बऱ्याच वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवून ती विझवण्यात यश आले. जखमींना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आगीनंतर बसच्या खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत १० जण गंभीररित्या होरपळले होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला. इतरांवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. (Haryana Bus Fire)

(हेही वाचा –IMD Rain Alert: महाराष्ट्रात पुढील काही तासांत मुसळधार पाऊस, तब्बल १५ जिल्ह्यांना अलर्ट)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमधील सर्व प्रवासी पंजाब आणि चंदीगड येथील रहिवासी आहेत. ते सर्वजण मथुरा आणि वृंदावन येथे दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ते घराच्या दिशेने परतत होते. मात्र तेवढ्यात एक्सप्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. बसमधील एका प्रवाशाच्या सांगण्यानुसार, सर्वजण नातेवाईक होते. त्यांनी मथुरा-वृंदावनला जाण्याचा प्लान आखला आणि एक बस भाड्याने बुक केली. दुर्घटनेच्या वेळी बसमध्ये एकूण 60 लोक होते, त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री सर्व जण बसमधून घराच्या दिशेने परत जात होते, तेव्हाच हा अपघात घडला आणि भीषण आग लागली. बघता बघता संपूर्ण बस पेटली. प्रवाशांनी कसेबसे त्यांचे प्राण वाचवत बाहेर उड्या टाकल्या. पण ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Haryana Bus Fire)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.