Haryana Election Result 2024 : हरियाणात भाजपाची विजयाची हॅट्रीक; पण लोकसभेच्या तुलनेत मतांचा टक्का घसरला

166
Haryana Election Result 2024 : हरियाणात भाजपाची विजयाची हॅट्रीक; पण लोकसभेच्या तुलनेत मतांचा टक्का घसरला
Haryana Election Result 2024 : हरियाणात भाजपाची विजयाची हॅट्रीक; पण लोकसभेच्या तुलनेत मतांचा टक्का घसरला

वंदना बर्वे

भारतीय जनता पक्षाने (BJP) हरियाणात विजयाची हॅट्रीक मारली असली, तरी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तुलनेत मतांच्या टक्केवारीत घट झाली आहे. भाजपाने हरियाणातील 57 वर्षांचा विक्रम मोडून 48 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. याउलट काँग्रेसला 37 जागा मिळाल्या असून विधानसभेतील तो मुख्य विरोधी पक्ष बनला आहे. (Haryana Election Result 2024)

(हेही वाचा – Congress चे आरोप तथ्यहीन, बेजबाबदार; निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण)

हरियाणाची सत्ता मिळाली असली, तरी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत घट आली असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी 6.17 टक्क्याने घटली आहे. लोकसभेत भाजपला 46.11 टक्के मते मिळाली होती. विधानसभेत 55 लाख 48 हजार 800 मते मिळाली आहेत. याची टक्केवारी 39.94 एवढी आहे.

काँग्रेस, शरद पवार गट आणि आपचीही मते घटली

दुसरीकडे, काँग्रेसच्या (Congress) मतांच्या टक्केवारीतही घट झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला 43.67 टक्के मिळाली होती. विधानसभेत 39.09 टक्के मते मिळाली आहेत. 4.58 टक्के मते घटली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची सुद्धा पिछेहाट झाली आहे. आपला लोकसभेत 3.94, तर विधानसभेत 1.79 टक्के मते मिळाली आहेत. बसपाच्या मतांच्या टक्केवारीत मात्र 0.54 टक्क्यांची वाढ झाली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची मतांची टक्केवारी सापशिडीच्या खेळाप्रमाणे घटली आहे. शरद पवार गटाला लोकसभेत 0.22 टक्के मते मिळाली होती, तर विधानसभेत केवळ 0.03 टक्के मते मिळाली आहेत.

अपक्ष आणि स्थानिक पक्षांना जनतेची पसंती

विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने अपक्षांना पसंती दिली आहे. लोकसभेत अपक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 1.84 टक्के होती, जी विधानसभेत वाढून 11.64 टक्क्यांवर पोहोचली आहे. इंडियन नॅशनल लोकदलाला लोकसभेच्या तुलनेत या वेळेस जास्त मते मिळाली आहेत. लोकसभेत 1.74 टक्के मते मिळाली होती, तर विधानसभेत 4.14 टक्के मते मिळाली आहेत. जेएनजेपी पक्षाची मते 0.03 टक्क्यांनी वाढली आहेत. (Haryana Election Result 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.