हरियाणा सरकार अविवाहीत वृद्धांना पेन्शन देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली. ते स्थानिक जनसंवाद कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अहवालानुसार १ लाख ८० हजारांहून कमी वर्षिक उत्पन्न असलेल्या ४५ ते ६० वर्ष वयोगटातील अविवाहितांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत १.२५ लाख अविवाहितांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. हरियाणा सरकार महिनाभरात ही योजना लागू करण्याची तयारी करत आहे. योजना लागू झाल्यानंतर, असे करणारे हरियाणा पहिले राज्य असेल. हरियाणामध्ये सध्या वृद्ध, विधवा आणि अपंगांना पेन्शन दिली जाते. हरियाणा सरकार बुटक्या लोकांना आणि नपुंसकांनाही आर्थिक मदत करते. यासोबतच ४५ ते ६० वर्षांपर्यंत केवळ मुली असलेल्या पालकांपैकी एकाच्या मृत्यूनंतर शासनाकडून २,७५० रुपये आर्थिक मदत दिली जाते. सरकारी सूत्रांनुसार, सरकार आता अविवाहित लोकांना २,७५० रुपये पेन्शन देऊ शकते.
(हेही वाचा – अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल – उद्योग मंत्री उदय सामंत)
हरियाणातील अविवाहितांसाठी पेन्शन सुरू होण्याचा संबंध येथील खालावलेल्या लिंग गुणोत्तराशीही जोडला जात आहे. ते आधी फारच वाईट होते. गेल्या १० वर्षांत हरियाणाचे लिंग गुणोत्तर ३८ अंकांनी सुधारले आहे. राज्यात २०११ मध्ये लिंग गुणोत्तर ८७९ होते, मात्र आता २०२३ मध्ये १००० मुलांमागे मुलींची संख्या ९१७ झाली आहे. हरियाणात अविवाहितांबरोबरच गरीब विधुरांना पेन्शन देण्याचा विचार केला जात आहे. प्रत्येक राज्यात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला विधवा निवृत्ती वेतनाच्या रूपात आर्थिक मदत दिली जाते. या रकमेतून ती सन्मानाने जगू शकते. पुरुषांनाही असे निवृत्ती वेतन देण्याचा विचार सरकार करत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community