जे जे रुग्णालयात अत्याधुनिक ऊर शल्यचिकित्सा विभाग सुरु

193
जे जे रुग्णालयात अत्याधुनिक ऊर शल्यचिकित्सा विभाग सुरु
जे जे रुग्णालयात अत्याधुनिक ऊर शल्यचिकित्सा विभाग सुरु

भायखळा येथील जेजे रुग्णालयात हृदय आणि छातीशी संबंधित ऊर शल्य चिकित्सा विभागाचे उदघाटन मंगळवारी राज्याचे नवनिर्वाचित वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शिक्षणमंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा विभाग लवकरच वातानुकूलित करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी दिले. शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले.

जे जेत दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीय आणि दारिद्र्य रेषेखालील रुग्णवर्ग मोठया प्रमाणात येतो. गेल्या दोन वर्षांपासून हृदयरोग विभागात सीएसआर फंडातून वेगवेगळी अद्यायावत वैद्यकीय उपकरणे आणली जात आहेत. रुग्णसेवेचा वाढता आलेख पाहता आता विभागच अद्यायावत करण्याकडे रुग्णालय प्रशासनाचा भर आहे. हृदयरोग विभागाच्या नूतनिकरणासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी जिल्हा नियोजन समिती निधीतून ४ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

(हेही वाचा – राज्यामध्ये खरीप पेरणी ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी; गहू, कडधान्ये, तेलासह डाळीही महागणार)

रुग्णालयातील इतर कक्षही अद्यायावत केले जातील, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. हृदयरोग विभागाबद्दल माहिती देताना रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे म्हणाल्या की, रुग्णालयात अतिरिक्त खाटा वाढवण्यात आल्या आहेत. पाच खाटांचे अतिदक्षता विभागही सुरु केले आहे. हा विभाग अद्यायावत झाल्याने रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यात मदत होईल. या कार्यक्रमाला विभागप्रमुख डॉ. मनोज जोशी तसेच इतर मान्यवर डॉक्टर्स आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.