गोवा ३० वाडी येथील हिंदूंचा (Hindu) छळ करून खांबाला बांधून हात कापणाऱ्या पोर्तुगीजांचा निषेध म्हणून दि. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी ‘हात कातरो’ (Hath Katro Khambh) खांबाची पूजा करण्यात आली. त्यावेळी हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार (Sunil Pawar) यांनी केले. या कार्यक्रमाला २५ कार्यकर्ते उपस्थित होते. (Goa)
( हेही वाचा : Banners : आदित्यला नक्की चिंता कुणाची? मुंबई विद्रुप होण्याची की भाजपाचे बॅनर लागतात याची)
छत्रपती शिवाजी महाराजांनी थांबवले हिंदूंवरील अत्याचार
सुनील पवार (Sunil Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार एकदा छत्रपती शिवाजी महाराज तामिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी महाराजारांना वाटेत काही लोक भेटले आणि त्यांनी मध्य गोव्यातील ३० वाडी भागात सुरु असणाऱ्या पोर्तुगीजांच्या अत्याचाराबद्दल महाराजांना सांगितले. (Goa) त्यावेळी पोर्तुगीज व्हॉईसरॉयने आदेश काढले होते की, ज्या हिंदू (Hindu) गोवा ३० वाडीत राहायचे असेल त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारा, अन्यथा आपली मालमत्ता सोडून गोव्यातून निघून जा, असा तो आदेश होता. पोर्तुगीज व्हॉईसरॉयच्या अत्याचाराला लोक कंटाळले होते. अनेकांनी ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यास नकार दिल्याने जवळपास ८० हजार लोकांचे हात एका खांबाला (Hath Katro Khambh) बांधून कापण्यात आले. तरीही अनेकांनी पोर्तुगीजांचा अत्याचार सहन केला, मात्र त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही. महाराजांना ही माहिती कळताच, त्यांनी पोर्तुगीज व्हॉईसरॉयला अद्दल घडवण्यासाठी १० हजार मावळ्यांचे खडे सैन्य पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले.
तेव्हा ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणाऱ्या पाद्रींना महाराजांनी विचारले, तुम्ही आमच्या भूमीत उभे आहेत, मग तुम्ही आता हिंदू धर्म स्विकारता का? तेव्हा पाद्री नाही म्हणाले. ज्यानंतर महाराजांनी पाद्र्यांची मुंडकी छाटण्याचा आदेश दिला आणि ती छाटलेली मुंडकी व्हॉईसरॉयला पाठवली. त्यानंतर व्हॉईसरॉयने आदेश मागे घेतला. त्यानंतर महाराज दक्षिणेकडे निघून गेले. कालांतराने त्यांचे सैन्यही तिथून गेल्यावर पोर्तुगीजांनी अत्याचार पुन्हा सुरु केला. त्यावेळी संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर आक्रमण केले. ‘हात कातरो’ (Hath Katro Khambh) हिंदू धर्मासाठी बलिदान दिलेल्या हजारो हिंदूंसाठी महत्त्वाचा वारसा आहे, असेही पवार (Sunil Pawar) म्हणाले. (Goa)
ख्रिसमसच्या दिवशीच या घटनेची हिंदूंना आठवण करून देण्यासाठी खांबाची पुजा करण्यात आली. हिंदू समाजात जागृती घडवून हिंदूंवर (Hindu) झालेल्या अत्याचाराची जाणीव करून देण्यासाठी आज खांबाची पूजा करण्यात आली. तसेच हिंदूंची एकजूट पुढील वर्षी याठिकाणी दिसून येईल, अशी आशाही सुनील पवार (Sunil Pawar) यांनी व्यक्त केली. (Goa)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community