Hathras Accident : सत्संगामधील चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू; प्रवचन देणारा भोले बाबा फरार

113
Hathras Accident : सत्संगामधील चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू; प्रवचन देणारा भोले बाबा फरार
Hathras Accident : सत्संगामधील चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू; प्रवचन देणारा भोले बाबा फरार

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या महाभयंकर घटनेमुळे (Hathras Accident) संपूर्ण देश हादरून गेला आहे. सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला. भोलेबाबा नावाच्या महाराजाच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविकांचा बळी गेला आहे. लहान मुलं, महिला, पुरुष आणि अनेक वृद्धांचाही यात बळी गेलाय आणि या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोलेबाबा (Bhole Baba) आता फरार झाला आहे. (Hathras Accident)

नेमकं काय घडलं?

सिकंदराराऊच्या फुलरई गावात भोलेबाबांचा सत्संग सुरु होता. या सत्संगाला 50 हजाराहून जास्त भाविक आले होते. सत्संग संपल्यानंतर घरी जाताना झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 116 भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जातेय. सत्संग संपल्या संपल्या बाहेर पडण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. बाहेर जाण्याच्या वाटेत दुचाकी पार्क केल्या होत्या, त्यामुळे अडथळे वाढले. या सगळ्या गोंधळात लोक एकमेकांवर पडत गेले आणि अनेक भाविकांचा गुदमरून मृत्यू झाला. (Hathras Accident)

(हेही वाचा- अदानी प्रकरणात SEBIने हिंडेनबर्ग आणि नॅथन अँडरसन यांना पाठवली कारणे दाखवा नोटीस!)

कोण आहे भोले बाबा?

भोले बाबाचं खरं नाव सूरज पाल (Suraj Pal) आहे. भोले बाबानं 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातली नोकरी सोडून सत्संग सुरू केलं. सत्संग सुरू केलेल्यानंतर तो साकार विश्व हरी भोले बाबा बनला. भोले बाबाचे उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशात मोठ्या संख्येनं अनुयायी आहेत. भोले बाबासोबत त्याची पत्नीही प्रवचन देते. कोरोनाच्या काळात भोले बाबाचा सत्संग वादात सापडला होता. हाथरसची दुर्घटना घडल्यानंतर भोले बाबा फरार आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. (Hathras Accident)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.