Hathras Stampede : भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…

165
Hathras Stampede : भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…
Hathras Stampede : भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११६ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hathras Stampede)

(हेही वाचा- Hathras Accident : सत्संगामधील चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू; प्रवचन देणारा भोले बाबा फरार)

आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, या संत्सगाचा आयोजक नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा अद्यापही फरार आहे, असं उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी सांगितले असल्याचे वृत्त हिंदूस्थान टाईम्सने दिले आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०५, ११०, १२६, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत ‘मुख्य सेवेदार’ असलेले देवप्रकाश मधुकर आणि चेंगराचेंगरी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hathras Stampede)

 “आम्हाला भोले बाबा (Bhole Baba) कॅम्पसमध्ये सापडले नाहीत. ते येथे नाहीत.” असं पोलीस उपअधीक्षक सुनील कुमार (Sunil Kumar) म्हणाले. दुपारी ३.३० च्या सुमारास भोले बाबा कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत असतानाच चेंगराचेंगरी झाली होती. त्यांची गाडी बाहेर पडल्यानंतर त्या कारच्या दिशेने लोकांनी धाव घेतली. परिणामी चेंगराचेंगरी होऊन ११६ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. (Hathras Stampede)

(हेही वाचा- Ganeshotsav : चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू)

अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी जमा झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली असण्याची शक्यता सिंकंदररावचे पोलीस प्रमुख आशिष कुमार यांनी वर्तविली. आग्रा येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगडच्या विभागीय आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली असून चौकशी सुरू केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातलगांना २ लाख रुपये व जखमींना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. (Hathras Stampede)

पंतप्रधान साहाय्यता निधीमधूनही मृतांच्या नातलगांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केली आहे. या दुर्घटनेबद्दल घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. महिला व मुलांसह भाविकांच्या मृत्यूचे वृत्त हृदयद्रावक आहे. मृतांच्या नातलगांप्रती सहवेदना व्यक्त करते, असे राष्ट्रपतींनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर लिहिले आहे. (Hathras Stampede)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.