राज्यात पुन्हा मास्क सक्ती? केंद्राचे राज्याला पत्र

127

महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबत आणखी पाच राज्यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्राने राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा नवे निर्बंध लागणार का? मास्कची पुन्हा एकदा सक्ती होणार का? असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

केंद्राने बोलावली बैठक

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, केंद्राने बुधवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि आजुबाजूच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने टेन्शन वाढवले आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ५ टक्के हा धोकादायक आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत ६३२ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर ४१४ बरे झाले. या पार्श्वभूमीवर डीडीएमएची महत्वाची बैठक घेतली जाणार आहे.

(हेही वाचा: तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याच्या बछड्यांना आई भेटली )

लवकरच निर्णय घेणार

देशातील कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरली आहे. रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांनी अनेक निर्बंध उठवले. पण आता मात्र महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लवकरच सरकार यावर काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.