- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मागील ऑगस्ट महिन्यात मुंबई महापालिकेने पहिल्या टप्प्यात २० ठिकाणे निश्चित करून ही ठिकाणे फेरीवालामुक्त करण्याचा निर्णय घेत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई हाती घेतली होती. मात्र, पुढे कारवाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेचे कान उपटत सध्या सुरु असलेली कारवाई पुढेही कायम ठेवली जावी अशाप्रकारचे निर्देश दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त झालेले पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतराच्या परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात महापालिका प्रशासन आणि पोलिस जाणीवपूर्वक दीडशे मीटर पुढील फेरीवाल्यांवर कारवाई करून इतर व्यवसायिकांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याने वारंवार ही कारवाई फसत असल्याचे दिसून येत आहे. (Hawker)
(हेही वाचा – Eknath Shinde निश्चिंत; Ajit Pawar गॅसवर..)
मुंबई महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे, अंधेरी, मालाड, बोरीवली, दहिसर, कुर्ला, घाटकोपर आदी रेल्वे स्थानकाच्या जवळील परिसरांचा समावेश आहे. तर कुलाबा कॉजवे, लालबाग राजा परिसर, वांद्रे लिंकिंग रोड, हिल रोड, मोहम्मद अली मार्ग लालबहादूर शास्त्री मार्ग आदी रेल्वे स्थानकांपासून दूर असलेल्या २० ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेत प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात केली होती. परंतु मागील काही दिवाळीपूर्वीच ही कारवाई थांबल्याने पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी स्थानकांचा परिसर अडवून व्यावसाय करण्यास सुरुवात केली आहे. (Hawker)
(हेही वाचा – BMC: आपल्या घराच्या बांधकातील राडारोडा पडला असेल तर वाहून नेण्यासाठी साधा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क)
याबाबत मुंबई उच्च न्यायालयात पुन्ही या याचिकेवर सुनावणी असता न्यायालयाने चर्चगेट परिसरात एक फेरीवाला दिसून आल्याचे निरिक्षण नोंदवत महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे महापालिकेला पहिल्या टप्प्यातील २० ठिकाणे फेरीवालामुक्त ठेवण्याच्यादृष्टीकोनातून कारवाई सुरुच ठेवली जावी अशाप्रकारचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यासर्व २०ठिकाणांवर पुन्हा एकदा महापालिकेच्यावतीने कडक कारवाई केली जाणार असल्याचे दिसून येत आहे. या २० ठिकाणांमध्ये दादर रेल्वे स्थानकांचा परिसर म्हणजे १५० मीटर पर्यंतचा परिसराचा समावेश असताना प्रत्यक्षात महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी हे स्थानकापासून १५० मीटरच्या पुढेही कारवाई करताना दिसत आहे रानडे मार्गावर स्थानकापासून ते वामन हरी पेठे यांच्या दुकानापर्यंत आणि स्थानकापासून डिसिल्व्हा मार्ग आणि जावळे मार्ग जिथे केळकर मार्गाला जोडतो तिथेपर्यंत कारवाई केली जाते. त्यामुळे प्रत्यक्षात दादर पश्चिम येथील कारवाईचे निर्देश काय आणि महापालिका प्रशासन कारवाई करते कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Hawker)
(हेही वाचा – ICC Women Championship : पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का; आयसीसीने ठोठावला दंड)
मुंबईतील ही २० ठिकाणे राहणार फेरीवालामुक्त
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर
- चर्चगेट उच्च न्यायालय परिसर
- कुलाबा कॉजवे
- दादर रेल्वे स्थानक पश्चिम बाजू
- दादर रेल्वे स्थानक पूर्व बाजू
- दादर टी टी परिसर
- लालबागचा राजा परिसर
- अंधेरी पश्चिम बाजू
- अंधेरी पूर्व बाजू
- कांदिवली मथुरादास रोड
- मालाड रेल्वे स्थानक पश्चिम बाजू
- बोरीवली रेल्वे स्थानक पश्चिम
- दहिसर भरुचा मार्ग
- कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम
- वांद्रे लिकींग रोड पश्चिम
- वांद्रे पश्चिम हिल रोड
- घाटकोपर रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम दिशा
- बी विभागातील लोकमान्य टिळक मार्ग
- मोहम्मद अली मार्ग
- लालबहादूर शास्त्री मार्ग
हेही पहा –
Join Our WhatsApp Community