- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांविरोधात (Hawkers) धडक कारवाई केली जात असली तरी प्रत्यक्षात ही कारवाई केवळ दिखावाच असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात कोणतेही स्वारस्य नसून कारवाई केली म्हणून चित्र निर्माण करणारे अधिकारी रस्ते आणि पदपथावर फेरीवाले आपले साहित्य बांधून ठेवत आहेत, त्यावर मात्र कोणतीही जप्तीची कारवाई करत नाही. त्यामुळे फेरीवाल्यांवर (Hawkers) कारवाई करता येत नसेल तर किमान पदपथ अडवून फेरीवाले जे सामान बांधून ठेवत आहेत, त्यावर तरी कारवाई करून ते जप्त केले जावे अशाप्रकारची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
(हेही वाचा – Shiv Sena UBT : …तर शिवसेना उबाठाला फिफ्टी पार करणे कठीण !)
मुंबई महापालिकेच्यावतीने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात (Hawkers) धडक कारवाई केली जात असून त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रेल्वे स्थानक, न्यायालय, मंदिर, महापालिका मंडई, रुग्णालय आदी परिसरातील १०० ते १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु महापालिकेच्यावतीने न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात योग्य ती कारवाई केली जात नाही. फेरीवाल्यांविरोधात (Hawkers) महापालिका आणि पोलिस हे केवळ कारवाईचे नाटक करत असल्याने जनता आता त्रस्त झाली आहे. महापालिकेला फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करायची नसून पोलिस आपल्या रेकॉर्डवर कारवाई दाखवण्यासाठी १२५० रुपयांची पावती फाडून घेतात आणि महापालिका केवळ गाडी उभी करून कारवाई केल्याचे चित्र निर्माण करते, असे रहिवाशांचेच म्हणणे आहे.
(हेही वाचा – Maharashtra Mandir Nyas Parishad : सोलापुरातून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ!)
मात्र, फेरीवाल्यांवर (Hawkers) जर कारवाई करता येत नसेल तर किमान त्यांचे जे साहित्य पदपथावर बांधून ठेवले जाते ते तरी हटवले जावे किंवा जप्त केले जावे अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. महापालिकेच्या ए विभागातील फोर्ट, नरिमन पॉईँट आणि कुलाबा येथील रस्त्याच्या पदपथावर फेरीवाल्यांचे ठेलेच बांधून ठेवले जात आहेत. दादरमधील जावळे मार्ग, रानडे मार्ग, केळकर मार्ग, टी एच कटारिया मार्ग यासह मुंबईतील अनेक भागांमध्ये अशाचप्रकारे पदपथांवर फेरीवाल्यांचे साहित्य बांधून ठेवत असल्याने महापालिकेला नियमानुसार यावर कारवाई करण्याचे अधिकार आहे. पण आपल्या अधिकाराकडेही महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नाही. कारवाई करायला गेल्यानंतर फेरीवाले पळून जातात आणि महापालिकेची गाडी निघून गेल्यानंतर फेरीवाले परत येतात. परंतु, रात्रीच्या वेळी बांधून ठेवलेले साहित्य जप्त करण्यास महापालिकेला कुणी अडवले नाही किंवा महापालिकेचे पथक आल्यानंतर ते सामान तिथून हटवतात, असे कुठेच होत नाही, मग या पदपथावर बांधून ठेवलेले फेरीवाल्यांचे (Hawkers) साहित्य जप्त का केले जात नाही असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community