
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ विभागामध्ये साबू सिद्दिक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या सुमारे २५ दुकानांवर बुधवारी ९ एप्रिल २०२५ रोजी कारवाई करण्यात आली. तसेच मुख्य डाक कार्यालय व सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात वाढीव जागा व्यापून अतिक्रमण केलेल्या दुकाने व फेरीवाल्यांवरही जप्तीची धडक कारवाई करण्यात आली आहे. (Hawkers Action)
(हेही वाचा – पुण्यश्लोक Ahilyadevi Holkar यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे होणार सुशोभीकरण)
साबू सिद्दिक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अनधिकृतरित्या व्यवसाय थाटून अतिक्रमण करण्यात आल्याचे ‘ए’ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यानुसार सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमित व अनधिकृत अशी सुमारे २५ दुकाने निष्कासित करण्याची कार्यवाही बुधवारी पार पाडली. त्यासाठी २ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन), ८ कामगार यांच्यासह १ पोलीस उपनिरीक्षक, ५ पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते. एक जेसीबी, जप्त तसेच निष्कासित साहित्य वाहून नेणारे एक वाहन, एक पोलीस व्हॅन या कारवाईसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. (Hawkers Action)
(हेही वाचा – Bombay High Court च्या नव्या इमारतीसाठी सव्वा दोन एकर जमीन 30 एप्रिलपर्यंत होणार हस्तांतरित)
तसेच, मुख्य डाक कार्यालयाजवळ सुमारे १२ ते १३ आणि सेंट जॉर्ज रुग्णालयालगतच्या गल्लीत सुमारे २० परवानाप्राप्त व्यावसायिकांनी मंजूर जागेच्या पलीकडे वाढीव जागेवर अतिक्रमण करुन व्यवसाय थाटल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या दोन्ही ठिकाणीही अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करुन वाढीव जागांवरचे अतिक्रमण हटवून त्यांचे संबंधित साहित्य जप्त केले. (Hawkers Action)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community