Hawkers Action : जे बोरिवलीकरांना जमले ते दादरकरांना कधी जमणार?

2011
Hawkers Action : जे बोरिवलीकरांना जमले ते दादरकरांना कधी जमणार?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येबाबत रेल्वे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला बोरिवली रेल्वे स्थानकाची पश्चिम दिशेचा परिसर फेरीवाला मुक्त राखण्यात महापालिकेसह पोलिसांना यश येत आहे, मात्र दुसरीकडे दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात महापालिकेसह पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे बोरिवलीतील भाजपाचे आमदार संजय उपाध्याय आणि आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांना जे जमते ते दादरचे आमदार महेश सावंत अणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांना कधी जमणार असा सवाल दादरकर विचारत आहेत. (Hawkers Action)

मुंबई महापालिकेने रेल्वे स्थानकासह इतर २० ठिकाणे ही फेरीवाला मुक्त करण्याचा निर्धार करत मोहिम हाती घेतली. दादर, बोरिवली रेल्वे स्थानकासह २० ठिकाणे फेरीवाला मुक्त राखण्यात महापालिकेला अपयश येत असल्याचे मत खुद्द न्यायालयाने व्यक्त केले आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि नाराजी व्यक्त केल्यानंतरही फेरीवाल्यांवरील कारवाईला काही गती मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (Hawkers Action)

(हेही वाचा – Hawker : महानगरपालिकेने जप्त केले २,७६३ अनधिकृत हातगाड्या, सिलिंडर आणि इतर साहित्य )

दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या शेजारी सेनापती बापट मार्ग, केशवसुत उड्डाणपूल, जावळे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग आणि रानडे मार्गावरील दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांची समस्या कायम असून या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही. वारंवार तक्रारी करूनही फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याने एकप्रकारची तीव्र नाराजी जाहीरपणे व्यक्त केली जात आहे. (Hawkers Action)

महापालिकेने फेरीवाल्यांविरोधातील कारवाई हाती घेतल्यापासून बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला महापालिकेच्या सामान जप्त करणारी वाहने उभी केल्यानंतर भीतीने एकही फेरीवाल्याला व्यवसाय करण्याची हिंमत होणार नाही. परंतु दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात महापालिकेच्या गाड्या उभ्या केल्यानंतरही त्या शेजारी फेरीवाल्यांकडून व्यवसाय केले जात आहेत. (Hawkers Action)

(हेही वाचा – राज्य सरकारने Atal Setu संदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

बोरिवलीमध्ये तत्कालिन आमदार सुनील राणे आणि त्यानंतर निवडून आलेले आमदार संजय उपाध्याय यांनी रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला आहे. महापालिका आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या मदतीने आमदारांनी पुढाकार घेत हा परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्यात यश मिळवले आहे. हा परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्यात येत असल्याने विभागातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जनतेकडून या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. (Hawkers Action)

परंतु जी कारवाई बोरिवलीमध्ये यशस्वीपणे केली जात आहे, तशीच कारवाई दादर रेल्वे स्थानक पश्चिम भागांत मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे बोरिवलीमध्ये ज्याप्रकारे आमदारांचे सहकार्य महापालिकेचे अधिकारी व पोलिसांना मिळते, तसे सहकार्य दादरमधील आमदार महेश सावंत यांच्याकडून महापालिकेचे अधिकारी व पोलिसांना का मिळत नाही. आमदार दादर पश्चिम रेल्वे स्थानक फेरीवालामुक्त करण्यासाठी पुढाकार का घेत नाही असा सवाल दादरमधील रहिवाशांकडून केला जात आहे. (Hawkers Action)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.