Hawkers : अनधिकृत फेरीवाला धंदा करताना आढळल्यास बीट मार्शलवर कारवाई

9857
Hawkers : अनधिकृत फेरीवाला धंदा करताना आढळल्यास बीट मार्शलवर कारवाई

मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर फेरीवाला प्रकरणात सरकारचे कान टोचल्यावर सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केल्यामुळे मुंबईतील फुटपाथ आणि रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले आहे. मनपा आणि पोलीस कारवाई नंतर देखील काही अनधिकृत फेरीवाले चोरून लपून फेरीचा व्यवसाय करताना आढळत आहे. रस्त्यावर एकही अनधिकृत फेरीवाला नको म्हणून मुंबई पोलिसांकडून ही जबाबदारी पोलीस ठाण्यात बिट मार्शलवर सोपवली आहे. (Hawkers)

फेरीवाला व्यवसाय करताना आढळून आल्यावर थेट बीट मार्शलवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील तीन पोलीस ठाण्यातील ५ बीट मार्शलवर याप्रकरणी कारवाई करून त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात २ पोलीस कॉन्स्टेबल, लोकमान्य टिळक मार्ग १ आणि पायधुणी सह अन्य एका पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण ५ पोलीस कॉन्स्टेबल यांची दक्षिण नियंत्रण कक्षात तात्पुरती बदली करण्यात आली आहे. ही कारवाई संपूर्ण मुंबईत करण्यात येणार असून ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृत फेरीवाला रस्त्यावर व्यवसाय करताना आढळून आल्यावर त्यांच्यावर याप्रकारे कारवाई करण्यात येईल असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. (Hawkers)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : तिरंदाजीत भारतीय महिला अपयशी, उपउपान्त्य फेरीत गुंडाळला गाशा)

मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्याचा प्रश्न निर्माण झाला असून या बेकायदेशीर फेरीवाल्यांनी केवळ रस्ते आणि फुटपाथच काबीज केले नाही तर यांची मजल रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल तसेच स्कायवॉक पर्यंत गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत फेरीवाल्यांची दखल घेऊन राज्य शासनाचे कान टोचल्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यात आले आहे. हे फेरीवाले पुन्हा बसू नये यासाठी मुंबई पोलिसांनी बीट मार्शल यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यासाठी फेरीवाला व्यवसाय करताना आढळून आल्यावर बीट मार्शल याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल अशी सक्त ताकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान आपल्या कर्तव्यास कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत दक्षिण मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग आणि पायधुणी पोलीस ठाण्यातील ५ बीट मार्शल (पोलीस कॉन्स्टेबल) यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. ही कारवाई त्यांना शिक्षा म्हणून तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. (Hawkers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.