-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने २० ठिकाणे ही फेरीवाला (Hawkers) मुक्त करण्याचा संकल्प करत हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये दादर पश्चिम येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास अपयश येताना दिसत आहे. त्यातच आता सर्व रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त करण्यासाठी मोहिम हाती घेतल्यानंतरही दादर पश्चिम रेल्वे स्थानक फेरीवालामुक्त ठेवण्यात यश मिळत नसल्याने आता दादरमधील फेरीवाले हा विषय महापालिकेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करूनही पुन्हा पुन्हा त्याचठिकाणी फेरीवाले दिसून येत असल्याने आता येथील फेरीवाल्यांवर विशेष कारवाई करण्याचा विचारात महापालिका प्रशासन आहे. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात यापुढे फेरीवाले आढळून आले तर त्यांना पकडून त्यांच्या विरोधात कडक करवाई करण्याचा विचार महापलिका प्रशासनाचा असल्याची माहिती मिळत आहे. (Hawkers)
मुंबई महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी २० ठिकाणे निश्चित करून ही सर्व परिसरत फेरीवाला मुक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या २० ठिकाणांमधील रेल्वे स्थानकांपासून १५०मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करून हे परिसर फेरीवालमुक्त (Hawkers) ठेवण्याचे निर्देश होते. परंतु महापालिकेच्या विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे तसेच परवाना विभागाच्या निरिक्षकांनी जाणीवपूर्वक १५० मीटरच्या पुढे कारवाई सुरु ठेवून या कारवाईला वेगळे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. यात २० ठिकाणांपैंकी केवळ दादर वगळता अन्य ठिकाणी यश मिळाले. त्यामुळे अखेर महापालिका प्रशासनाला सर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त आणि स्वच्छ राखण्याची मोहिम हाती घेतली. (Hawkers)
(हेही वाचा – Child Mortality: बालमृत्यूंबाबत सरकारी पोर्टलवर माहितीची लपवाछपवी; एप्रिल २०२४ नंतरची माहितीच उपलब्ध नाही)
मात्र, आता दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर (Hawkers) कारवाई केल्यानंतही पुन्हा पुन्हा फेरीवाले तिथे बसून दिसून येत आहे. महापालिकेच्यावतीने कारवाई केल्यानंतरही तिथे काही वेळेत फेरीवाले दिसून येत असल्याने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चिंता तसेच संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी आता कडक कारवाई करण्याच्या विचारात महापालिका प्रशासन असून लवकरच याबाबतचे आदेश जारी केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही कारवाई अधिक तीव्र करतानाच वारंवार तिथे धंदा थाटणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल तसेच यासाठी वेगळ्या कायदेशीर बाबींचा अभ्यासही सुरु असल्याची माहिती मिळत आहे. (Hawkers)
दादरमध्येच का होत नाही कारवाई अयशस्वी
दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंतच्या फेरीवाल्यांवर (Hawkers) कारवाई करणे अपेक्षित तथा तसे निर्देश असतानाच महापालिका आणि पोलिस हे १५० मीटर परिसरातील फेरीवाल्यांना अभय देत १५०मीटर पुढील फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. त्यामुळे केवळ रेल्वे स्थानक परिसरातील अर्थात स्थानकापासून १५०मीटर अंतरावरील फेरीवाल्यांना वाचवण्यासाठीच सरसकट रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, जावळे मार्ग आणि केळकर मार्ग आदींवरील सर्व फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे अशाप्रकारची प्रतिक्रिया फेरीवाल्यांकडून खासगीत ऐकायला मिळत आहेत. (Hawkers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community