Hawkers : फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या महापालिका प्रशासनाला माजी नगरसेविकेने दिली ऑफर, म्हणाल्या…

1741
Hawkers : फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या महापालिका प्रशासनाला माजी नगरसेविकेने दिली ऑफर, म्हणाल्या…
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांच्या (Hawkers) अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त असून गोरेगाव पूर्वमधील कृष्ण वाटिका रोड, साईमार्ग, आरे भास्कर रोड, फिल्मसिटी मार्ग, मोहन गोखले मार्गावर मागील दोन वर्षांतील वाढत्या फेरीवाल्यांमुळे एकप्रकारे स्थानिक जनतेची डोकेदुखी वाढली आहे. या वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे स्थानिक जनता त्रस्त असून ना लोकांना चालण्यास पदपथ तसेच रस्ते नसल्याने नागरिकांचा रोष आता अधिक वाढू लागला असून जनतेला होत असलेल्या या त्रासाबाबत स्थानिक नगरसेविकेने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. फेरीवाल्यांना जर आर्थिक देवाणघेवाणीतून संरक्षण दिले जात असेल तर या फेरीवाल्यांकडून (Hawkers) किती रक्कम मिळते ते सांगा, आम्ही हवेतर तुम्हाला ही रक्कम देतो, पण या फेरीवाल्यांवर कारवाई करून जनतेला फेरीवालामुक्त पदपथ आणि रस्ते उपलब्ध करून द्या अशाप्रकारची ऑफरच स्थानिक भाजपाच्या माजी नगरसेविकेने महापालिका प्रशासनाला दिली आहे.

गोरेगावमधील भाजपाच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी पी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त संजय जाधव यांना निवेदन पाठवत ही फेरीवाल्यांवर (Hawkers) वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अखेर ही ऑफर दिली आहे. सातम यांनी आपल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, कृष्णवाटिका रोड आणि साई मार्गावर तब्बल १५०च्या लगबग फेरीवाले आहेत, आरे भास्कर रोडवर २०, फिल्मसिटी रोडवर ५० पेक्षा अधिक, मोहन गोखले मार्गावर २० अशाप्रकारे फेरीवाले पदपथ आणि रस्ते अडवून बसले असून हे सर्व फेरीवाले गेल्या दीड ते दोन वर्षांतच खुप वाढले आहेत. या वाढत्या फेरीवाल्यांमुळे जनता त्रस्त असून या मार्गावरील प्रत्येक सोसायटींकडून मला याबाबतच्या तक्रारींची निवेदने प्राप्त होत आहेत. लोक व्यक्तिगत भेटून तक्रारी करत आहेत. त्यामुळे यासर्व रस्त्यांवरील फेरीवाल्यांना (Hawkers) तात्काळ हटवून स्थानिकांना चालण्यास आणि वाहतूक सुरळीत राखण्यास मदत करावी अशाप्रकारे मी आपणाकडे वारंवार तक्रारी करत आले आहे. पंरतु महापालिका प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद लाभत नाही आणि कारवाई होत नाही.

New Project 24 1

(हेही वाचा – महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा विकास व संरक्षण करण्याची Naresh Mhaske यांची मागणी)

आज नागरिकांना चालण्यास ना पदपथ ना रस्ते. फेरीवाल्यांना (Hawkers) पदपथावर आपले सामान ठेवून रस्त्यावरच आपले धंदे थाटले आहेत. त्यामुळे पदपथच चालण्यास नसल्याने लोकांना रस्त्यावरुन चालावे लागते. आणि आधीच रस्ते अरुंद आहेत. त्यातच फेरीवाल्यांनी धंदे पदपथासह रस्त्यावर थाटल्याने लोकांना रस्त्यावरुन चालण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. आणि लोक रस्त्यावरुन चालत असल्याने वाहनांमुळे त्यांना अपघात होण्याची भीती आहे. यामुळे या येथील सर्व रस्त्यांवरुन वाहनांनाही जाण्यास जागा अपुरी असल्याने वाहतूक कोंडीचाही त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे यासर्वांचा एकच उपाय आहे तो म्हणजे फेरीवाल्यांना हटवणे,असे सातम यांनी म्हटले आहे.

त्यामुळे विभागातील जनतेला फेरीवाल्यांमुळे (Hawkers) होत असलेल्या त्रासाबद्दल आपण गंभीर असून जर काही आर्थिक देवाणघेवाणीमुळे ही कारवाई महापालिका प्रशासन करत नसेल तर तर दर महिन्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किती रक्कम मिळते ते तरी सांगा, ती रक्कम आम्ही आपल्याला देते, पण काही करून या फेरीवाल्यांना हटवा आणि माझ्या विभागातील जनतेला या त्रासातून मुक्त करा अशी आर्जवी प्रिती सातम यांनी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.