Hawkers Policy : फेरीवाल्यांच्या नगरपथ विक्रेता समितीवरील सदस्य निवडीकरता २९ ऑगस्ट रोजी निवडणूक

1462
Hawkers Policy : फेरीवाल्यांच्या नगरपथ विक्रेता समितीवरील सदस्य निवडीकरता २९ ऑगस्ट रोजी निवडणूक

केंद्र शासनाच्या पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१६ मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक तसेच समन्वयन अधिकारी (फेरीवाला धोरण) यांच्या निर्देशांनुसार, नगरपथ विक्रेता समिती गठीत करण्यात येत आहे. मुंबईत १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांवरील सदस्य निवडीकरता येत्या २९ ऑगस्ट २०२४ रोजी निवडणूक होणार आहे. तर यासाठी १२ आणि १३ ऑगस्ट २०२४ रोजी या निवडणुकीकरता उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. (Hawkers Policy)

मुंबईत नोंदणीकृत नगरपथ विक्रेता मतदारांची एकूण संख्या ३२ हजार ४१५ एवए आहे. नगरपथ विक्रेता समित्यांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानासाठी प्रत्येक विभाग (वॉर्ड) स्तरावर मतदान केंद्र असतील. या निवडणुकीसाठी ४२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण ३५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सुरक्षेसाठी १७५ सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. (Hawkers Policy)

मुंबईत नगरपथ विक्रेता समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक परिमंडळ स्तरावर कामगार आयुक्त (महाराष्ट्र राज्य), मुंबई यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. मतदार किंवा संभाव्य उमेदवारांना या निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित परिमंडळातील या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी परिमंडळ कार्यालयात संपर्क साधता येईल. तर, शिखर समितीचे कार्यालय तिसरा मजला, मलनिसारण प्रकल्प इमारत, दादर पंपिंग स्टेशन, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम) येथे असेल. (Hawkers Policy)

(हेही वाचा – Hawkers Policy : फेरीवाल्यांच्या नगरपथ विक्रेता समितीतील आरक्षण जाहीर, ६४ समिती सदस्यांमध्ये २४ असतील महिला)

नगरपथ विक्रेता समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम

नगरपथ विक्रेत्यांच्या शिखर समितीची निवडणुकीशी संबंधित प्रक्रिया तिसरा मजला, मलनिसारण प्रकल्प इमारत, दादर पंपिंग स्टेशन, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम) येथे तर परिमंडळनिहाय समित्यांच्या निवडणुकीशी संबंधित प्रक्रिया संबंधित परिमंडळ कार्यालयात पार पडेल. परंतु, मतदानाची प्रक्रिया सर्व विभाग कार्यालयनिहाय (वॉर्ड) पार पडेल. (Hawkers Policy)

या संकेतस्थळावर पाहू शकतात पथविक्रेता मतदार यादी

पथविक्रेत्यांची निवडणूक घेण्यासाठी अंतिम करण्यात आलेली नोंदणीकृत पथविक्रेता मतदार यादी ही महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये (वॉर्ड) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (Hawkers Policy)

परिमंडळ निहाय असलेल्या मतदार फेरीवाल्यांची संख्या
  • परिमंडळ-१ मधील ७ हजार ६८६,
  • परिमंडळ-२ मधील ५ हजार ३०३,
  • परिमंडळ-३ मधील ४ हजार ६६८,
  • परिमंडळ-४ मधील ७ हजार ५०१,
  • परिमंडळ-५ मधील २ हजार १६०,
  • परिमंडळ-६ मधील ३ हजार ०३३,
  • परिमंडळ-७ मधील २ हजार ०६४ (Hawkers Policy)
मतदान प्रक्रियेचा असा आहे कार्यक्रम
  • नामनिर्देशन पत्राचे वाटप – दिनांक ५ ते ६ ऑगस्ट २०२४ (सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान)
  • नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – दिनांक १२ ते १३ ऑगस्ट २०२४ (सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान)
  • प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी – दिनांक १४ ऑगस्ट २०२४ (सकाळी ११ ते संपेपर्यंत)
  • प्राप्त नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करणे – दिनांक १६ ऑगस्ट २०२४
  • आक्षेप अर्ज स्वीकारणे – दिनांक १७ ऑगस्ट २०२४ (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान)
  • वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे – दिनांक १९ ऑगस्ट २०२४ (दुपारी ३ वाजेनंतर)
  • नामनिर्देशन पत्र मागे घेणे – दिनांक २० ऑगस्ट २०२४ (सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान)
  • माघारीनंतरची अंतिम यादी प्रसिद्ध करणे – दिनांक २० ऑगस्ट २०२४ (सायंकाळी ५ वाजेनंतर)
  • प्रत्यक्ष मतदान – दिनांक २९ ऑगस्ट २०२४ (सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
  • मतमोजणी – दिनांक २९ ऑगस्ट २०२४ (सायंकाळी ५ वाजेनंतर)
  • निवडणूक निकाल जाहीर करणे – दिनांक २९ ऑगस्ट २०२४ (मतमोजणीनंतर) (Hawkers Policy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.