
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
शीव पश्चिम येथील रोड क्रमांक २१ मधील इंदिरा मार्केटजवळील परिसरातील मागील काही महिन्यांपासून अनधिकृत स्टॉल्ससह फेरीवाल्यांची (Hawkers) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. एका विशिष्ट समाजाच्या लोकांकडून हे अतिक्रमण केले जात असून या वाढत्या अनधिकृत स्टॉल्सह फेरीवाल्यांमुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शाळकरी मुलांनाही घेवून जाणाऱ्या पालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याने यासर्व स्टॉल्स आणि फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. याची दखल घेवून स्थानिक माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन यावर कधी कारवाई करते याकडे रहिवाशांचे लक्ष आहे.
माटुंगा शीव येथील प्रभाग क्रमांक १७२ च्या माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांना निवेदन सादर करत शीव (सायन) पश्चिम येथील रोड क्रमांक २१, इंदिरा सार्केटजवळील परिसरा अनधिकृत स्टॉल्स आणि वाढत्या फेरीवाल्यांवर (Hawkers) कारवाई केली आहे. शिरवडकर यांनी आपल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून अनधिकृत स्टॉल्स तसेच फेरीवाल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या वाढत्या अनधिकृत स्टॉल्स तसेच अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात माझ्याकडे विभागातील रहिवाशांकडून तक्रारी प्राप्त होत असून याबाबत महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये वारंवार तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अखेर आपल्याला विनंती करत आहे.
(हेही वाचा – Ambedkar Jayanti 2025 : धर्म, धर्मनिरपेक्षता आणि Constitution !)
महानगरपालिकेच्या अभिलेखावर या मार्केट परिसरात फक्त ८२ स्टॉल धारकांची संख्या असताना प्रत्यक्षात एकेका स्टॉल्सच्या आडून अनधिकृत स्टॉल्स उभे राहिले आहेत, या स्टॉल्स धारकांनी आता पदपथ काबिज केले असून त्यांच्या आडून अनधिकृत फेरीवालेही (Hawkers) पदपथ आणि रस्त्यांवर ठाण मांडत असल्याने विभागातील नागरिकांना चालण्यास जागा उरलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी असले तरी ते अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांनी अडवले आणि त्यात रस्त्यावरील जागेवरही कब्जा केला. त्यामुळे रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले आणि वाहने उभी असल्याने नागरिकांना चालण्यास जागा उरलेली नाही. छोट्या मुलांना शाळेत सोडणाऱ्या पालकांना तसेच मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यांच्या मधून जावे लागत असल्याने बऱ्याचदा अपघात होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे वाहनचालक तथा मालक आणि पादचारी तथा रहिवाशी यांची तू तू – मैं मैं होते, परिणामी या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. या सर्व प्रकाराला येथील अनधिकृत स्टॉल्सधारक आणि अनधिकृत फेरीवाले (Hawkers) जबाबदार असून जर यांना येथून हटवले तर या समस्येचे निवारण होवू शकते, असे म्हटले आहे.
(हेही वाचा – विहीर अधिग्रहीत करण्याच्या निर्णयानंतर Tanker मालक नरमले; आयुक्तांच्या चर्चेनंतर संप मागे)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रेल्वे स्थानक, महापालिका मंडई, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज आदीपासून १०० ते १५० मीटर अंतरावर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी आहे, त्यामुळे याठिकाणी इंदिरा मार्केट असल्याने, न्यायालयाच्या निर्देशानुसार किमान १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना (Hawkers) मज्जाव करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. तरी कृपया न्यायालयाच्या निर्देशाच्या अधीन राहून तसेच रहिवाशांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून या भागातील अनधिकृत स्टॉल्सधारकांवर तसेच फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी शिरवडकर यांनी निवेदनाद्वार केली आहे. त्यामुळे एफ उत्तर विभागाचे नवनियुक्त सहायक आयुक्त या अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांवर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community