- विशेष प्रतिनिधी,मुंबई
मागील ऑगस्ट महिन्यात मुंबई महापालिकेने (BMC) पहिल्या टप्प्यात २० ठिकाणे निश्चित करून ही ठिकाणे फेरीवाला मुक्त करण्याचा निर्णय घेत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई हाती घेतली. मात्र, ही २० ठिकाणेच फेरीवाला मुक्त ठेवण्यात महापालिका प्रशासनाला अपयश येत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयाने ही नाराजी व्यक्त केल्यानंतर पुन्हा यासर्व २० ठिकाणी पुन्हा तीव्र कारवाई होणे अपेक्षित असतानाच महापालिकेच्यावतीने याकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. न्यायालयाच्या निर्देशाकडेही आता महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करु लागल्याने मुंबईकरांना फेरीवाल्यांची (Hawkers) समस्या झेलावीच लागेल हे आता स्पष्ट होत आहे.
दरम्यान, दादर रेल्वे स्थानक (Dadar Railway Station) परिसरात शनिवारी फेरीवाल्यांवर कारवाई झाली असली तरी या कारवाईला न्यायालयाचे निर्देश कारणीभूत नव्हते तर सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखार दादर परिसरात येवून गेल्याचे दिसल्याने पोलिसांनी विशेष पुढाकार घेऊन ही कारवाई केली होती, मात्र उर्वरीत भागांत ही कारवाई दिसली नाही.
(हेही वाचा – Kolkata Doctor Murder Case: कोलकात्याच्या महिला डॉक्टरला अखेर न्याय मिळाला; आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी)
दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने या २० ठिकाणांवरील फेरीवाल्यांवर होत असलेली कारवाईबाबत असमाधान व्यक्त केले असले तरी त्या आधीच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने सध्या सुरु असलेली कारवाई पुढेही कायम ठेवली जावी अशाप्रकारचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने निश्चित केलेली २० ठिकाणे फेरीवाला मुक्त दिसायला हवी होती, परंतु ही ठिकाणे फेरीवालामुक्त राखण्यात महापालिकेला अपयश आल्याचे मतच न्यायालयाने नोंदवल्याने महापालिका प्रशासनाच्या कामगिरीबाबतच शंका उपस्थित झाली आहे.
या २० ठिकाणांपैंकी दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात शुक्रवारी मोठ्याप्रमाणात फेरीवाले (Hawkers) दिसून आले होते, तर शनिवार असूनही कारवाई दिसून आली. परंतु ही कारवाई पोलिसांच्या पुढाकाराने झाल्याने बोलले जात आहे. सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा दादर पश्चिम परिसरात आल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही कारवाई करून विशेष लक्ष ठेवले होते. त्यामुळे दादर पश्चिम भागांत ही कारवाई शनिवारी दिसून आली असली तरी अन्य भागांमध्ये शनिवारी कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे न्यायालयाचे निर्देश महापालिकेचे अधिकारी जबाबदारीने घेत नसून ते आता न्यायालयालाही जुमानत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
दादर पूर्व बाजुला फाळके मार्ग (Phalke Road) आणि ग्रंथालय मार्गावर मोठ्याप्रमाणात फेरीवाले दिसून येत असून बोरीवली स्थानक पश्चिमेला कारवाई होत असली तरी स्कायवॉकवर हे फेरीवाले (Hawkers) दिसून येत होते, तर दहिसर पूर्व भरुचा मार्गावरही फेरीवाले (Hawkers) शनिवारी कायम होते.
(हेही वाचा – Abhishek Nair : सितांशू कोटक यांच्या समावेशानंतर सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरचं स्थान डळमळीत)
मुंबईतील ही २० ठिकाणे फेरीवालामुक्त खरोखरच दिसली का?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर
चर्चगेट उच्च न्यायालय परिसर
कुलाबा कॉजवे
दादर रेल्वे स्थानक पश्चिम बाजू
दादर रेल्वे स्थानक पूर्व बाजू
दादर टी टी परिसर
लालबागचा राजा परिसर
अंधेरी पश्चिम बाजू
अंधेरी पूर्व बाजू
कांदिवली मथुरादास रोड
मालाड रेल्वे स्थानक पश्चिम बाजू
बोरीवली रेल्वे स्थानक पश्चिम
दहिसर भरुचा मार्ग
कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम
वांद्रे लिकींग रोड पश्चिम
वांद्रे पश्चिम हिल रोड
घाटकोपर रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम दिशा
बी विभागातील लोकमान्य टिळक मार्ग
मोहम्मद अली मार्ग
लालबहादूर शास्त्री मार्ग
हेही पहा –