HDFC Life ची ‘लाइफ फ्रीडम इंडेक्स’ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध

135
HDFC Life ची ‘लाइफ फ्रीडम इंडेक्स’ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध

भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या एचडीएफसी लाइफने (HDFC Life) लाइफ फ्रीडम इंडेक्सची (एलएफआय) नवीनतम आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. एलएफआयसाठी एचडीएफसी लाइफने २०११ साली सर्वेक्षण सुरू केले. हा निर्देशांक भारतीय ग्राहकांमधील ‘आर्थिक स्वातंत्र्या’च्या स्तराचे मापन करतो. सर्व वर्गांमधील उपभोक्त्यांच्या सातत्याने उत्क्रांत होत राहणाऱ्या आर्थिक गरजांबद्दल खोल माहिती पुरवण्यात या निर्देशांकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सर्वेक्षणात प्रौढांच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांचे निरीक्षण केले जाते, त्यांचे वर्गीकरण तीन समूहांत केले जाते : यंग अस्पायरंट्स (तरुण महत्त्वाकांक्षी), प्राउड पेरेंट्स (पालकत्व अभिमानाने निभावणारे) आणि विजडम इन्व्हेस्टर्स (अनुभवाचा उपयोग करून गुंतवणूक करणारे).

(हेही वाचा – शरद पवारांनी जातीने भेट दिलेल्या Markadwadi ग्रामस्थांचा मतदानाचा कल काय; आकडेवारी समोर)

एलएफआयमध्ये चार उपनिर्देशांक असतात :

● आर्थिक जागरूकता व परिचय निर्देशांक
● आर्थिक नियोजन निर्देशांक
● आर्थिक पर्याप्तता व समाधान निर्देशांक
● आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक

हे सर्वेक्षण (२०२४) निल्सेनआयक्यूने १५ शहरांमध्ये घेतले (४ विभाग व श्रेणी १, २, ३ शहरे यांचे उत्तम प्रतिनिधित्व) आणि त्यात २०७६ जणांनी भाग घेतला. २०२४ मधील ताज्या अभ्यासानुसार, लाइफ फ्रीडम इंडेक्स 70.8 अंकांवर आहे (२०२१ सालाच्या तुलनेत ९ अंक वर). कोविड साथीनंतर काहीशी खालावलेली ग्राहकांमधील भावना पूर्वपदावर आली असल्याचे यातून समजते. ग्राहकांच्या आर्थिक दृष्टिकोनातही आत्मविश्वासाच्या निकषावर एकूण सुधारणा झाली आहे. एलएफआयच्या सर्व उपनिर्देशांकांमध्ये झालेल्या वाढीमुळेच ही वाढ झाली आहे. विशेषत: आर्थिक नियोजन आणि आर्थिक पर्याप्तता व समाधान या उपनिर्देशांकांमध्ये झालेली वाढ या वाढीला पूरक ठरली आहे. मात्र, आर्थिक जागरूकता व परिचय निर्देशांक तुलनेने कमी प्रमाणात वाढल्यामुळे आर्थिक उत्पादनांबद्दल अधिक चांगल्या पद्धतीने माहिती देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (HDFC Life)

(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy, Adelaide Test : रोहित शर्माची धोनी आणि विराटच्या या नकोशा विक्रमाशी बरोबरी)

एलएफआयमुळे अधोरेखित झालेली आणखी एक बाजू म्हणजे ग्राहकांच्या प्राधान्यक्रमांची यादी. मुलांची आर्थिक सुरक्षितता, तंदुरुस्ती (शारीरिक व मानसिक दोन्ही) आणि स्वत:चे राहणीमान सुधारणे या यादीत अग्रक्रमाने येतात. निदर्शनास आलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सेवानिवृत्तीचे नियोजन (retirement planning) हळूहळू एक आर्थिक जबाबदारी म्हणून महत्त्व प्राप्त करू लागले आहे, वयानुसार ही बाजू अधिकाधिक महत्त्वाची होत आहे. सेवानिवृत्तीचे नियोजन करताना उपभोक्ते आरोग्यासाठी, दैनंदिन आयुष्यासाठी व मुलांना मदत करण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा विचार करतात. ग्राहक वर्गांची श्रेणी लावल्यास एलएफआयनुसार, विजडम इन्व्हेस्टर्स कमाल वाढ दाखवत आघाडीवर आहेत, त्याखालोखाल यंग अॅस्पायरंट्स व प्राउड पेरेंट्सचे क्रमांक लागतात. एलएफआयच्या नवीन आवृत्तीतील वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे श्रेणी ३ ग्राहक व काम करणाऱ्या स्त्रिया यांच्या एलएफआयमध्ये दखलपात्र वाढ झाली आहे, त्यांच्या आर्थिक नियोजन व आत्मविश्वासातील सकारात्मक बदल यातून स्पष्ट होतो.

डिजिटल प्रगती व अधिक कनेक्टिविटीमार्फत आर्थिक उपलब्धतेत झालेल्या सुधारणेमुळे श्रेणी ३ उपभोक्त्यांमधील वाढीच्या प्रवाहाला चालना मिळाली असण्याची शक्यता आहे. डिजिटल प्रगती आणि स्त्री सक्षमीकरणासाठी राबवले जाणारे उपक्रम यांमार्फत आर्थिक शिक्षण सहजगत्या उपलब्ध झाल्यामुळे काम करणाऱ्या स्त्रियांमधील निर्देशांक वाढला आहे. मागील आवृत्तीपासून एचडीएफसी लाइफ आयुर्विमा (Life Insurance) आत्मविश्वास निर्देशांकाचीही पाहणी करत आहे. यामध्ये ग्राहकांच्या आर्थिक नियोजन व उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रक्रियेतील आयुर्विम्याच्या भूमिकेचे मापन केले जाते. या निर्देशांकात ९.३ अंकांनी वाढ झाली आहे, व्यक्तींच्या आर्थिक नियोजनात आयुर्विम्याला महत्त्वपूर्ण घटक म्हणून मान्यता दिली जाऊ लागल्याचे यातून स्पष्ट होते. आयुर्विम्यामुळे ग्राहकाचा आर्थिक गरजा व दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याचा आत्मविश्वास वाढत असल्यामुळे आयुर्विम्याचे महत्त्व वाढत आहे. पश्चिम विभागाचा निर्देशांक सर्वोच्च आहे, तर पश्चिम विभागाने सर्वाधिक वाढीची नोंद केली आहे. श्रेणी ३ बाजारपेठांमध्ये दखलपात्र सुधारणा दिसून आली आहे. आयुर्विमा एक महत्त्वपूर्ण आर्थिक उत्पादन ठरत असल्याचे हे लक्षण आहे. एकंदर आयुर्विमा उत्पादनांबाबतची जागरूकता वाढत आहे आणि आर्थिक सुरक्षितता, मोबदला, मुलांचे भवितव्य आणि राहणीमान राखणे यांसारख्या गरजा यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत आणि आयुर्विमा खरेदीला चालना देत आहेत. (HDFC Life)

(हेही वाचा – ईव्हीएमवर शंका असल्यास खासदारांनी राजीनामा द्यावा; Navneet Rana यांचा विरोधकांवर निशाणा)

एचडीएफसी लाइफच्या (HDFC Life) स्ट्रॅटेजी विभागाचे समूह प्रमुख व मुख्य मार्केटिंग अधिकारी विशाल सभरवाल हा अहवाल प्रकाशित करताना म्हणाले, “भारतीय ग्राहकांमधील एकंदर आर्थिक सज्जतेचा निर्देशक प्राप्त व्हावा या उद्देशाने आम्ही लाइफ फ्रीडम इंडेक्स (एलएफआय) या सर्वेक्षणाची सुरुवात केली. हा निर्देशांक काळाच्या ओघात उत्क्रांत होत जाताना आम्ही पाहिला आहे, प्रत्येक सर्वेक्षणाच्या वेळी आर्थिक सज्जतेच्या निकषावरील ग्राहकांचा आत्मविश्वास सुधारलेला आम्हाला आढळला आहे. यातून आर्थिक सुरक्षिततेवर भर देऊन विकास आणि भवितव्याप्रती ठेवला जाणारा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. यावर्षीच्या अभ्यासात काम करणाऱ्या स्त्रिया व श्रेणी ३ बाजारपेठांमधील आर्थिक स्वातंत्र्याचे स्तर उंचावल्याचे विशेषत्वाने दिसून आले. आयुर्विम्यावरील विश्वासाचा निर्देशांक (लाइफ इन्शुरन्स कॉन्फिडन्स इंडेक्स) लक्षणीयरित्या वाढला आहे, यातून आयुर्विम्याला सर्वांगीण आर्थिक नियोजनात दिले जाणारे महत्त्व अधोरेखित होत आहे. एचडीएफसी लाइफच्या माध्यमातून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यातून आणखी चालना मिळेल असे आम्हाला वाटते. तसेच संपूर्ण आयुर्विमा उद्योगाच्या ‘२०४७ पर्यंत सर्वांना विमा’ पुरवण्याच्या प्रवासासाठीही या अभ्यासाची मदत होणार आहे.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.