मोठा झटका: गृहकर्ज आणखी महागले; ‘या’ बॅंकांकडून व्याज दरवाढ

95

देशातील सर्वात मोठी खासगी बॅंक एचडीएफसीसह, पंजाब नॅशनल बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेने आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसीने गृह कर्जासाठी रिटेल प्राईम लेंडिंग रेट (आरपीएलआर) मध्ये 5 बेसिस पाॅईंटची वाढ केली आहे. एका महिन्यात बॅंकेकडून ही तिसरी वाढ असून, कर्जदारांना त्याचा फटका बसणार आहे.

पुन्हा एकदा व्याजदरात वाढ

एचडीएफसीसह पंजाब नॅशनल बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेनेही एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पाॅईंटने वाढ केली आहे. गेल्या महिन्यात एचडीएफसीसह बॅंकेने दोन वेळा व्याज दरात वाढ केली होती. 1 मे रोजी एचडीएफसीने व्याज दरात 5 बेसिस पाॅईंटची वाढ केली होती. यानंतर 7 मे रोजी 30 बेसिस पाॅईंटची वाढ करण्यात आली होती. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.

( हेही वाचा: हा कसला सामाजिक न्याय? न्यायालयाने सामाजिक न्यायमंत्री मुंडेंना सुनावले )

आणखी महागणार

रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. नवीन रेपो दर 4 टक्क्यांवरुन 4.4 टक्के झाला आहे. रेपो दर वाढल्याने सर्व बॅंकांनी गृह कर्जाच्या दरात वाढ करणे सुरु केले आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.