धक्कादायक! पेपरफुटी प्रकरणात कंत्राटी कंपनीच्या अधिका-यांचा सहभाग

86

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोग्य भरती पेपरफुटीसाठी न्यासा कंपनी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. या पेपरफुटी प्रकरणात सामिल असलेल्या न्यासाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दलालांना केली अटक

एका टोळीचा पर्दाफाश म्हाडा भरती परीक्षेआधी करण्यात आला होता. या भरती परीक्षेचा पेपर फुटण्याआधीच कारवाई करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर आणखी काही जणांना अटक करण्यात आली होती. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी या प्रकरणाबाबत आणखी माहिती दिली. आरोग्य विभागाचा २४ ऑक्टोबर रोजी झालेला गट ‘क’ चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्तांनी दिली. गट ‘ड’ चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत गट ‘क’ चा पेपर फोडण्यात सहभागी असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

( हेही वाचा :धान उत्पादक शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणार )

न्यासा कंपनीच्या अधिका-यांचाही समावेश

हे दलाल एका पेपरसाठी पाच ते आठ लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यात न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारीदेखील सहभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रश्नपत्रिका प्रिंट करताना न्यासाच्या अधिकाऱ्यांनी पेपर फोडल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. आतापर्यंत पाच पेपरफुटी प्रकरणात २८ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून जवळपास सहा कोटींचा मुद्देमाल आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे, असे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. २४ तारखेला झालेला आरोग्य विभागाचा गट ‘क’ चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारीदेखील सहभागी होते असा खुलासा यावेळी त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.